
रिक्षा समोर आडवा येवुन त्याने वाहन थांबवले. दारु पेण्यासाठी पैशांचा तगादा लावल्याने वाद झाला आणि रिक्षाचालकास शिवीगाळ करत चॉपरने हल्ला चढवत जखमी केले.
जळगाव ः शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यापासून खुन, चाकु हल्ले, दारुसाठी पैसे मागून मारहाण करण्याच्या घटना वाढलेल्या आहे. त्यात शिवाजीनगर परिसरात दोन खुन झाले असून बुधवारी रात्री हुडको परिसरात दारु पेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन रिक्षाचालकावर चॉपरने हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आवश्य वाचा- वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम
रिक्षाचालक जनार्दन सोमनाथ कोळी (वय-४९) हे कुटूंबीयांसह शिवाजीनगर हुडको परिसरात वास्तव्यास आहेत. बुधवार (ता.२५) रोजी ते नेहमी प्रमाणे रिक्षास्टॉपवरुन घराकडे निघण्यासाठी जात असतांना गजानन विलास बाविस्कर (रा.शिवाजीनगर हुडको ) हा त्यांच्या रिक्षा समोर आडवा येवुन त्याने वाहन थांबवले. दारु पेण्यासाठी पैशांचा तगादा लावल्याने जनार्दन कोळी यांनी नकार दिल्याने गजानन बाविस्करने वाद घालून शिवीगाळ करत चॉपरने हल्ला चढवत जखमी केले.
तक्रार केली म्हणून ठार मारण्याची धमकी
जखमी अवस्थेत कोळी यांनी शहर पेालिस ठाणे गाठले. पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्याने गजानन याने थेट सोमनाथ कोळी यांचे घर गाठून तेथे धिंगाणा करत, त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. शहर पेालिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे