जिल्ह्यातील एकोनपन्नास हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित 

जिल्ह्यातील एकोनपन्नास हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित 

जळगाव ः राज्यातील महाविकास आघाडी शासन आल्यानंतर महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू झाली. ही योजना मागील (भाजप) शासनापेक्षा शेतकऱ्यांना माहिती भरण्यासाठी सोपी होती. मात्र या योजनेत अर्ज भरूनही ४९ हजार ६९४ शेतकरी अद्यापही कर्जमुक्त पासून वंचित आहे. विशेषतः एप्रिल महिन्यापासून या योजनेचा निधी वर्ग होणे बंद झाले आहे. 

मागील शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यात अनेक अटी शर्ती, २००९ नंतरचे थकबाकीदार असायला हवा, घरात कोणी शासकीय लाभार्थी नको, नोकरदार नको, पेन्शनर नको यासह विविध अटी होत्या. यामुळे कर्जमाफी योजनेत सूरवातीपासूनच घोळ सुरू होता. अनेक लाभार्थी या योजनेचे वंचित असतानाच राज्यातील शासन बदलले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असे महाविकास आघाडीचे शासन आले. त्यांनी कर्जमाफी योजने ऐवजी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. 

कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या अकैांटला आधारकार्ड संलग्न करण्याची मोहीम राबविली गेली. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे ज्याठिकाणी खाते होते तेथे आधारक्रमांक टाकला की त्याची कर्जाची रक्कम, भरलेली रक्कम समोर दिसत होती. त्याला ती रक्कम मान्य असल्यास लागलीच त्याचा क्रमांक कर्जमाफी योजनेला कळविला जायचा. काही दिवसात त्याची कर्जमाफीची रक्कम त्याच्या खात्यात जमा होत होती. अगोदर ही योजना दीड लाख कर्ज असलेल्यांसाठी होती, नंतर दीड लाखानंतरच्या कर्जदारासाठीही योजना जाहीर झाली. मात्र दीड लाखानंतऱची जेवढी रक्कम आहे तेवढी शेतकऱ्याना अगोदर भरणे गरजेचे होते. तरच त्याला या योजनेचा लाभ मिळणार होता. 
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४१ हजार ९१४ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची ८१६ कोटीची रक्कम देण्यात आली आहे. तर ४९ हजार ६९४ शेतकरी अद्यापही योजने पासून वंचीतच आहे. सोबतच जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते त्यांना विशेष अनुदान मिळणार होते. असे ५० हजार शेतकरी नियमित कर्ज भरणारे होते. त्यांनाही विशेष अनूदान मिळालेले नाही. 


आकडे बोलतात… 

अपलोड झालेली खाती--१ लाख ७३ हजार ७८३ 
विशिष्ठ क्रमांकाची कर्ज खाती-५१ लाख ६२ हजार ८२४ 
आधार प्रमाणीकरण खाती--१ लाख ५७ हजार ५२३ 
आधारप्रमाणीकरण शिल्लक खाती--५ हजार ३०१ 
तक्रार असलेली खाती--८ हजार २०८ 
डीएलसीद्वारे तक्रार निकाली खाती--२ हजार ९६३ 
डीएलसीकडे तक्रार प्रलंबित खाती--३ हजार ३२३ 
लाभ मिळालेली खाती--१ लाख ४१ हजार ९१४ 
लाभाची रक्कम--८१६ कोटी ३२ लाख 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com