जळगाव जिल्ह्यात ५३ हजार रुग्ण कोरोनातून झाले मुक्त !

देविदास वाणी | Wednesday, 9 December 2020

जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ९६९७ बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३१० तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०१७ व इतर असे एकूण १२८५४ बेड आहे.

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची (ॲक्टीव्ह रुग्ण) संख्या ४२७ पर्यत खाली आली आहे. आज रोजी ५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ५३ हजार १३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. 

वाचा- वन्य प्राण्यांचा शेतात हौदास; रब्बी हंगाम वाया जाण्याच्या चिंतेत शेतकरी -

जिल्ह्यात एकूण ४२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अवघी १४६ इतकी आहे यातील ३४ रुग्ण आयसीयुमध्ये असून ७३ रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु आहे. तर २८१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३०६ कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद असून सध्या जिल्ह्यातील मृत्यूदर २.३८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५२ हजार ९७३ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले असून पैकी ५४ हजार ८७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या अवघे ८७ अहवाल प्रलंबित आहे. सध्या जिल्ह्यात २२७ व्यक्ती गृह अलगीकरणामध्ये आहेत तर ६२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Advertising
Advertising

जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ९६९७ बेड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३१० तर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १०१७ व इतर असे एकूण १२८५४ बेड असून त्यापैकी २०१९ ऑक्सिजनयुक्त तर ३२२ आयसीयु बेड आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

आवश्य वाचा- जैताणे येथे बस-ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, 29 प्रवासी जखमी
 

तालुकानिहाय रुग्ण असे 
तालुका-- पॉझिटिव्ह--बरे झालेले-- मृत्यु-- उपचार घेणारे 

जळगाव शहर- १२६४२--१२२१०-- २७९--१५३ 
जळगाव ग्रामीण--२५७६--२४८८--८२--६ 
भुसावळ--४२६०--४०११--१७१--७८ 
अमळनेर-- ४४९१--४३५४--१०३--३४ 
चोपडा--४४३८ --४३५०-- ७४--१४ 
पाचोरा--१९७३--१८८८--७४--११ 
भडगाव--१९२०--१८६९ -- ४४--७ 
धरणगाव--२२०३--२१४५-- ५०--८ 
यावल--१८३२--१७६३--६६--३ 
एरंडोल--२८०२--२७४५--४८--९ 
जामनेर--४२०९----४१२१--७३--१५ 
रावेर--२२६०--२१४३--१०१--१६ 
पारोळा--२५३३--२५०७--१८--८ 
चाळीसगाव--३६१८--३५१८--७५--२५ 
मुक्ताईनगर--१७९३--१७३४--३५--२४ 
बोदवड--८५३--८३६--१३ -- ४ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे