जळगावातील बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड
अनेक तक्रारी शासनाकडे गेल्याने आज या प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाड सत्र सुरू केले आहे.
जळगाव ः येथील मल्टी-स्टेट असलेल्या बी.एच.आर. (भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था) अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानी आज पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे शहरात आज एकच खळबळ उडाली आहे.
आवश्य वाचा- बचतगटांच्या नावाखाली तेरा महिलांना लावला लाखोचा चुना
जळगाव शहरातील बी. एच. आर. पतसंस्था घोटाळा प्रकरणी सर्व संचालक कारागृहात असून अजून ही ठेविदारांच्या ठेवी मिळालेल्या नसून त्यांचा प्रश्न जटील झालेला आहे. मात्र ठेविदारांच्या पावत्या २० ते ४० टक्के रक्कम देवून शंभर टक्के पैसे दिल्याच्या सांगितले जात आहे. या पावत्यांच्या गैरव्यवहार प्रकरणी अनेक तक्रारी शासनाकडे गेल्याने आज या प्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाड सत्र सुरू केले आहे.
बँकेच्या अवसायकार धाड
बी. एच. आर. पथसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजीनगर येथील घरी सकाळीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पतसंस्थेच्या कार्यालयास इतर शहरातील काही ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी सुरू केल्या आहे.