गणेशमूर्तींच्या उंचीबाबत मूर्तिकारांमध्ये संभ्रम 

बुधवार, 1 जुलै 2020

सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन गणेशोत्सवाला काही नियम व अटींच्या आधारे परवानगी देऊ शकते. यामुळे नुकतीच गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत "श्रीं'ची मूर्ती चार फुटाची व दोन जणांना उचलता येईल, अशा स्वरूपाची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

जळगाव  : "कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव नियम पाळून साधेपणाने साजरा करा, तसेच श्रीगणेशाची मूर्तीही चार फुटांपर्यंत असावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. परंतु शासनाचे आदेश अद्यापपर्यंत मूर्तीकारांना प्राप्त झालेले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला असून, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे "श्रीं'च्या आगमनावरही "कोरोना'चे सावट जाणवत आहे. गणेशोत्सव काळात गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याने याठिकाणी कोरोना संसर्ग बळावण्याची भीती असल्याने शासन स्थरावरही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. परंतु सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करणार असल्याचे बोलले जात असल्याने शासन गणेशोत्सवाला काही नियम व अटींच्या आधारे परवानगी देऊ शकते. यामुळे नुकतीच गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत "श्रीं'ची मूर्ती चार फुटाची व दोन जणांना उचलता येईल, अशा स्वरूपाची असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 
 
मूर्तीकारांमध्ये संभ्रम 
सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने गर्दी न करता साजरा करण्यावर भर दिला आहे. यामुळे जानेवारीपासून मूर्तीकार "श्रीं'च्या मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. परंतु मूर्तींची सार्वजनिक मंडळांकडून अद्यापही बुकिंग न झाल्याने व शासनाने मूर्ती किती फुटाच्या तयार कराव्या, याबाबत आदेश न दिल्याने मूर्तीकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
लाखोंचे नुकसान 
यंदा "कोरोना'च्या संकटामुळे "श्रीं'च्या मूर्तींची बुकिंग झालेली नाही. मूर्तीकारांनी मोठ्या मूर्त्या बनविल्या असून, यात मूर्तीकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी चार फुटांपर्यंतची "श्रीं'ची मूर्ती असावी, अशी घोषणा केली आहे. परंतु मूर्ती बनविण्यासाठी दिवाळी नंतर लगेच सुरवात केली जाते तर जूनमध्ये मूर्त्यांवर रंगाचा हात फिरवला जातो. सद्य:स्थितीत चार फुटाच्या ज्या मूर्त्या बनवल्या आहेत, त्याच विकणार आहे. अद्याप शासनाचे मूर्ती बनविण्यासंबंधी कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाही. 
- राजू राणा, मूर्तिकार, जळगाव