उज्वला गॅसचे कनेक्शन महागले, सबसिडी बंद; महिलांमध्ये संताप 

उज्वला गॅसचे कनेक्शन महागले, सबसिडी बंद; महिलांमध्ये संताप 

 जळगाव  ः जिल्ह्यातील तब्बल १३ लाख ५५ हजार कुटुंबीयांकडे घरगुती गॅस सिलिंडर आहेत. त्यांना केंद्र शासनातर्फे देण्यात येणार सबसिडी गेल्या एप्रिल महिन्यापासून बंद झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दर महिन्याला सबसिडीपोटी ग्राहकांना दोनशे ते अडीचशे रुपयांदरम्यान सबसिडी ग्राहकांच्या थेट बँकेच्या खात्यात जमा होत होती. तब्बल पाच महिन्यांपासून सबसिडी रखडल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

केंद्रात भाजप शासन आल्यापासून सर्व गॅस धारकांचे बँक अकौंट गॅस सिलिंडरच्या खात्याशी संलग्न केले आहे. यामुळे ग्राहकांनी सिलिंडर रिफील केल्यानंतर दोन ते चार दिवसात गॅसची सबसिडी थेट बँकेत जमा होत होती. याचा सर्वसामान्य कुटूंबियांना दिलासा मिळत होता. कोरोना’मुळे सर्वच क्षेत्रातील महागाई वाढली आहे. अनेकांना कोरोनामुळे रोजगार गमवावे लागले. नोकऱ्या गेल्या अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्यांना सबसिडीमुळे तेवढाच आधार मिळाला होता. अनेक ग्राहकांनी गॅस एजन्सी धारकांकडे सबसिडी बंद झाल्याची तक्रारी नोंदविल्या. मात्र वरूनच ती बंद झाली आहे, आम्ही काही करू शकत नाही असे उत्तरे ग्राहकांना मिळाली. 

उज्वला गॅसही महागला 
गरीब कुटुंबीयांसाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत संयोजन घेण्यासाठी पूर्वी एक हजार रुपये लागत होते. 
आता चक्क २ हजार ७०० ते ३ हजार रुपये लागतात. 

आकडे बोलतात….. 
गॅसधारक कुटूंब-५९ लाख ३ हजार ६४२ 
गॅसधारकांची संख्या--१३ लाख ५५ हजार 


मार्च महिन्यानंतर गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. पूर्वी आठशे ते साडेआठशे ला मिळणारा सिलिंडर आता ५९९ ला मिळत आहे. यामुळे केंद्राने सबसिडीची रक्कम ग्राहकांना देणे बंद केले आहे. भारत पेट्रोलियम कंपनी केवळ सिलिंडर पुरविण्याचे काम करते. 

अशोक डोगर, विभागीय 
व्यवस्थापक भारत पेट्रोलियम 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com