कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘वज्रमूठ’: रस्त्यावर शुकशुकाट; पोलिसांचा खडा पहारा 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘वज्रमूठ’: रस्त्यावर शुकशुकाट; पोलिसांचा खडा पहारा 

जळगाव: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जळगावसह भुसावळ, अमळनेरला मंगळवारपासून १३ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यास बुधवारी (ता. ८) दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात बुधवारी नागरिक बँकेचे काम, औषधे घेण्यासाठी बाहेर पडले. मात्र, त्यांची संख्या मोजकी होती.

अत्यावश्‍यक सेवेतील नागरिक ओळखपत्र घेऊनच बाहेर पडल्याने पोलिसांनी त्यांना अडविले नाही. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले तिन्ही ठिकाणच्या परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत होते. शहरात येणाऱ्यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी सुरू होती. 

अमळनेरला झीरो लॉकडाउन कारवाईचे द्विशतक 
अमळनेर येथील पोलिसांनी दोन दिवसांत कारवाईचे द्विशतक पूर्ण केले असून, ७२ हजारांचा दंड वसूल केला आहे. शहरात बुधवारी विनाकारण फिरणाऱ्या १०३, तर बुधवारी ९७ असे २०० जणांना कारवाई केली. गुरुवारी ३७ हजार, तर बुधवारी ३५ हजार असा ७२ हजारांचा दंड वसूल केला. यात विनापरवाना, विनामास्क फिरणे याचा समावेश आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अंबादास मोरे, सहाय्यक निरीक्षक प्रकाश सदगीर, एकनाथ ढोबळे, उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, राहुल लबडे, पोलिस नाईक डॉ. शरद पाटील, हवालदार राजेंद्र पाटील, संजय पाटील, दीपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, गोकुळ सोनवणे, इतर ठाण्यांचे पोलिस कर्मचारी व अमळनेर आगाराचे चालक किरण धनगर आदी या पथकात होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com