
तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासोदा येथे अनेक मातब्बर उमेदवारांना मतदारांनी नाकारले.
एरंडोल : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून मतदारांनी नवख्या उमेदवारांच्या बाजूने कौल देऊन प्रस्थापित उमेदवारांना पराभूत केले. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या.
आवश्य वाचा- प्रचाराला गावात न फिरला..न मतदान केले; तरी 'तो' निवडणूकीत विजयी झाला, हे कसे झाले शक्य ? वाचा सविस्तर
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी सोमवारी झाली. मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार, त्यांचे समर्थक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करीत होते.
नवख्या उमेदवारांचा दम
तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासोदा येथे अनेक मातब्बर उमेदवारांना मतदारांनी नाकारले. भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी सरपंच संजय चौधरी यांचा युवा उमेदवार पुरुषोत्तम चौधरी यांनी पराभव केला. तसेच सुनेने सासूचा पराभव करून सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला.
वाचा- कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला!
सायली स्वप्निल पाटील या सुनेने चुलत सासू तथा माजी सरपंच सिंधुबाई पाटील यांचा पराभव केला. निपाणे येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील यांच्या पॅनलला सुमारे तीस वर्षानंतर पराभव पत्करावा लागला असून या ठिकाणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संजय तोताराम पाटील यांनी विजयश्री खेचून आणली.
संपादन- भूषण श्रीखंडे