शेतकऱ्याची हिंम्‍मत पहा..एवढे मोठे जेसीबी पचविण्याचा तयारी

राजु कवडीवाले | Tuesday, 17 November 2020

कोरोना संसर्गाच्या काळात जेसीबी हे एका व्याक्तिला 70 हजार रुपये महिन्याने भाडेत्त्वावर देण्याचे सांगुन एका व्यक्‍तीस सदरचे जेसीबी दहा लाख पन्नास हजार रुपयास परस्पर विकुन पोबारा केल्याची माहिती समोर आली. 

यावल (जळगाव) : गुजरात राज्यातून एका शेतकऱ्याची दिशाभुल व फसवणुक करून भाडेतत्त्वावर देण्याच्या नावाखाली जेसीबी आणून परस्पर विकुन विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न यावल पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी कार्यत्तपरता दाखवुन जेसीबीचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.
गुजरात राज्यातील शेरपुरा भरूच येथील एका व्यक्तिने शेत मशागतीसाठी 13 नोहेंबर 2019 ते 8 जानेवारी 2020 या काळात नागजीभाई राणाभाई भरवाड (रा. रामदेवनगर, बडोदा गुजरात) आणि विजयभाई नागजीभाई भरवाड, हरिषभाई नागजीभाई भरवाड (सर्व रा. रामदेवनगर , बडोदा, गुजरात) यांच्या मालकीचे सुमारे 32 लाख रुपये किंमतीचे जेसीबी खरेदी केले होते. संबंधीत व्यक्तीने जेसीबीचे मुळ मालक नागजीभाई भरवाड यांचा विश्वास संपादन करून कोरोना संसर्गाच्या काळात जेसीबी हे एका व्याक्तिला 70 हजार रुपये महिन्याने भाडेत्त्वावर देण्याचे सांगुन एका व्यक्‍तीस सदरचे जेसीबी दहा लाख पन्नास हजार रुपयास परस्पर विकुन पोबारा केल्याची माहिती समोर आली. 

असा लागला शोध
यावल पोलीसांना बडोदा पोलिसांकडुन जेसीबी क्रमांक (जीजे 06 जेएफ1908) हे जेसीबीच्या मुळ मालकाची फसवणुक करून परस्पर विक्री करण्यात आल्याची माहीती मोबाईलवर मॅसेजव्दारे प्राप्त झाली. त्‍यानुसार यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ यांनी तपासाची चक्रे फिरवुन या तक्रारीची दखल घेत शोधकामास वेग दिला. अखेर 16 नोव्हेंबरला यावल तालुक्यातील उंटावद गाव शिवारातील उंटावद चिंचोली रस्त्यावरून गुजरात राज्यातुन शेतकऱ्याची फसवणुक करून विकलेल्या जेसीबीचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे