सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम; त्यांना ठाण्याला दाखवा : गुलाबराव पाटील यांचा पलटवार 

सकाळ वृत्तसेवा | Friday, 13 November 2020

करीट सोमय्या यांनी वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात नुकतीच 'रिपब्लिक टीव्ही'चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अर्णव यांच्या अटकेनंतर भाजपनं ठाकरे सरकारला विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

जळगाव : शिवसेनेचे कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियावर जमिन खरेदीचे आरोप करणारे भाजपाचे नेते करीट सोमय्या यांचे वक्तव्य बेताल आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना ठाण्याला दाखविले पाहीजे अश्या शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते, पालकमंत्री गुलाबराव पाटील सोमय्या यांच्यावर पलटवार केला. 
करीट सोमय्या यांनी वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात नुकतीच 'रिपब्लिक टीव्ही'चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. अर्णव यांच्या अटकेनंतर भाजपनं ठाकरे सरकारला विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. किरीट सोमय्या यांनी ठाकरे, वायकर आणि नाईक कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर पालकमंत्री पाटील यांनी सोमय्या यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. 

डोक्‍याला शॉक दिला तर..
पालकमंत्री पाटील म्हणाले की, भाजपाचे नेते करीट सोमय्या यांचे वक्तव्य बेताल आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना ठाण्याला दाखविले पाहीजे. ठाण्यावर गेल्यावर त्यांच्या डोक्याला जर शॉक दिला तर त्यांचे हे वक्तव्य बंद होईल. ज्या ठाकरे यांच्या पायाशी बसून सोमय्या खासदार झालेत. त्या ठाकरे कुटुंबियांवर ते आरोप करतात. मला वाटते हा ऐहसान फरामोश माणूस आहेत. अश्या ऐहसान फरामोश माणसाने उध्दव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप करुन नये. सुरुवातीला सोमय्यांनी आपली औकात बघावी.