जळगाव जिल्ह्यात पावसाची अर्धशतकाकडे वाटचाल; आतापर्यंत ४९ टक्के पाऊस  

जळगाव जिल्ह्यात पावसाची अर्धशतकाकडे वाटचाल; आतापर्यंत ४९ टक्के पाऊस  

जळगाव  : जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची अर्धशतकी वाटचाल झाली आहे. एकूण सरासरीच्या ४९.५ टक्के पाऊस झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. पावसाची एकूण सरासरी ६३८.३३ मिलिमीटर आहे. त्यांपैकी आजअखेरपर्यंत ३१२.८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतातील तण काढणे, कीटकनाशकाची फवारणी करणे, खते देणे आदी कामे करताना शेतकरी शेतात दिसू लागले आहेत. 

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने अनेक दिवसांपासून ओढ दिली होती. अनेक दिवसांच्या ओढीनंतर १५ व १६ जुलैला सर्वत्र धुवाधार पाऊस झाल्याने नद्या, नाले वाहू लागले. या पावसामुळे पिकांची वाढ आता जोमाने हेात आहे. पावसाच्या उघडिपीमुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीची कामे करण्यास उसंत मिळाली आहे. शेताशेतात शेतकरी मजुरांकडून किंवा शेतात तण काढणे, पिकांना वाढीसाठी खतांची मात्रा देणे आदी कामे करीत आहेत. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान महिनाभर पाऊस झाला नाही तरी चालेल, अशी स्थिती असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

१२ हजार ९०० टन खते येणार 
जळगाव जिल्ह्यात कोणत्याही खताचा तुटवडा नाही व होणारही नाही. ३१ जुलैपर्यंत १२ हजार ९०० टन खतांची आवक होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तक्रार, अडचणी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस 

तालुका-- टक्के 
जळगाव--४८.२० 
जामनेर--४४.५५ 
एरंडोल--४४.२९ 
धरणगाव--४३.२२ 
भुसावळ--३२.७४ 
यावल--४३.८२ 
रावेर--४८.८० 
मुक्ताईनगर-५२.०८ 
बोदवड--४०.७९ 
पाचोरा--४७.७० 
चाळीसगाव--५३.२८ 
भडगाव--४८.५८ 
अमळनेर-६८.३२ 
पारोळा--४७.२२ 
चोपडा--६५.०२ 
एकूण--४९.०२

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com