"नो हाकर्स' झोनमध्ये आढळल्यास...आता जागेवरच हातगाड्या तोडल्या जाणार ! 

"नो हाकर्स' झोनमध्ये आढळल्यास...आता जागेवरच हातगाड्या तोडल्या जाणार ! 

जळगाव : शहरातील राजकमल चौकात बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हॉगर्सने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अतिक्रमणाची कारवाई राजकमल चौकात केली. यावेळी हॉकर्सच्या जागेवरच हातगाड्या तोडण्यात आल्या. 

शहरातील मुख्य रस्त्यावर हॉकर्समुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेने रस्त्यावरचा बाजार गोलाणी मार्केटच्या तळघरात स्थळांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार नोंदणीकृत हॉकर्सला गोलाणी संकुलातील तळमजल्यावरील ओट्यांवर बसण्याची कार्यवाही मनपा प्रशासनाने केली. याला काही हॉकर्स ने विरोध केला आहेत. त्यात अतिक्रमण पथक राजकमल टाकी चौकात कारवाई करत असतांना काही हॉकर्सने अतिक्रमण निर्मूलनच्या पथकावर हल्ला केला होता. या घटनेत पथकातील एक कर्मचारी व वाहनाचे नुकसान झाले होते. या प्रकरणी महापालिकेने 14 जणांविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. 

 आर्वजून पहा :  कंडारीतील गृहस्थाचा दगडाने ठेचून खून ;रात्री सोबत मद्यप्राशन करणारा मित्र ताब्यात 

आता जागेवरच हातगाडी तोडली जाणार ! 
महापालिका प्रशासनाकडून आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी आज घेतला आहे. आज सापडलेल्या हॉकर्सच्या गाड्या तोडण्यात आल्या. तसेच यापूढे हॉकर्सनी रस्त्यावर हातगाड्या लावल्यास जागेवरच चेपकवण्याचा इशारा उपायुक्त वाहुळे यांनी दिला. यावेळी दरम्यान, डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांनी देखील राजकमल चौकात भेट देऊन पाहणी केली. 

नक्की वाचा :   माजी महापौर ललीत कोल्हे चारदिवस पोलिस रिमांडवर 

एक दुकान केले सिल 
शनिपेठेत आज लॉकडाऊनचे नियमांच्या उल्लघंण करणारे अशोक एजन्सी हे दुकान दुपारी दोन वाजता उपायुक्त वाहुळे यांच्या आदेशानुसार सिल केले. यावेळी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिक्षक एच. एम. खान आदी कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com