esakal | मेल आयडीवरून ‘आयपीएल’वर सट्टा; दहा दिवसात दुसऱ्यांदा बेटींगचा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

ipl cricket match bettingipl cricket match betting

मोबाईल तपासला असता त्यामध्ये आयडी क्रमांक व रुपये टाइप केलेले, तसेच आयपीएल २०२० प्रॉफिटकिंगचे ॲप व बाहुबली फ्री टिप्स हेदेखील डाउनलोड केलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले. 

मेल आयडीवरून ‘आयपीएल’वर सट्टा; दहा दिवसात दुसऱ्यांदा बेटींगचा प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सिंधी कॉलनी परिसरात आयपीएलवर सट्टा बेटिंग घेणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून बेटिंगसाठी वापरला जाणारा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्याच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील जित बेकरीजवळ एक तरुण मेल आयडी डेव्हलप करून आयपीएलवर सट्टा बेटिंग घेत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांना दिली. लोकरे यांनी पाठविलेल्या अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय बाविस्कर, किशोर पाटील, चेतन सोनवणे, सुधीर साबळे यांच्या पथकाने सिंधी कॉलनी परिसरात धाव घेत एकजण मोबाईल फोनवर चॅटिंग करीत उभा असल्याचे दिसले. त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव रोहित गुलशन गेरा (वय २५, रा. लीलावती अपार्टमेंट, मोहाडी रोड, मूळ रा. मध्य प्रदेश, रामलीला मैदान, महितपूर, जि. उज्जैन) असे सांगितले. दरम्यान, रोहितसह महाबळमधील स्टेट बँक कॉलनीतील आनंद गांधी या दोघांविरुद्ध पोलिस कर्मचारी मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

मोबाईलमध्ये होते ॲप 
पोलिसांनी रोहितचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये आयडी क्रमांक व रुपये टाइप केलेले, तसेच आयपीएल २०२० प्रॉफिटकिंगचे ॲप व बाहुबली फ्री टिप्स हेदेखील डाउनलोड केलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले. 

‘मॅचविन आयडी’ विकून कमाई 
आयपीएलमध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल यांच्यात अबुधाबी येथे मॅच सुरू आहे. सट्टा खेळण्यासाठी आनंद गांधी यांच्याकडून रोहितने मॅचविन आयडी मागवून घेतला. हा आयडी मिळाल्यानंतर रोहित हा आयडी इतर लोकांना विकत होता. या आयडीवरून लोक सट्टा बेटिंग खेळत असल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले.