जळगावचा ‘फौजदार’ अजय देवगण, सुनील शेट्टी सोबत करणार अभिनय

सचिन जोशी | Wednesday, 25 November 2020

महाविद्यालयीन शिक्षण घेताना टीव्ही दुरुस्तीच्या दुकानावर पार्टटाइम जॉब केला. त्यातूनच प्रचंड मेहनत करून यश मिळवावे आणि आई- वडिलांची गरिबी दूर करावी, यासाठी लीलाधर यांनी जिद्द बाळगली.

जळगाव : सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेत शेतमजूर म्हणून काम करणारा तरुण जिद्दीने फौजदार होता... आणि या तरुणाच्या अंगी असलेल्या कलागुणाने त्याला थेट अभिनय क्षेत्रात संधी मिळते, या यशाचे उदाहरण दोनगावच्या लीलाधर पाटील यांच्या रूपाने समोर आलेय. 

वाचा- प्रवास करतांना आता ‘कोरोना’ रिपोर्ट सोबत ठेवावा लागेल -

दोनगाव (ता. धरणगाव) या खेडेगावात लीलाधर यांचा जन्म शिवाजी पाटील यांच्या कुटुंबात झाला. आई- वडील दोन्ही शेतकरी. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी मजुरी करणे आणि उरलेले पाच दिवस शाळा, असे बालपण. 

Advertising
Advertising

कमवा अन्‌ शिका 
नंतर जळगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणाला सुरवात केली. महाविद्यालयीन शिक्षण घेताना टीव्ही दुरुस्तीच्या दुकानावर पार्टटाइम जॉब केला. त्यातूनच प्रचंड मेहनत करून यश मिळवावे आणि आई- वडिलांची गरिबी दूर करावी, यासाठी लीलाधर यांनी जिद्द बाळगली.  तर एका स्पर्धा परीक्षा केंद्रात अर्धवेळ समन्वयक व शिक्षकाची भूमिका पार पाडताना एमपीएससी परीक्षा द्यायला सुरवात केली. त्यात यश मिळाले आणि पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. 

आवश्य वाचा- राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा 

मुंबई पोलिस ते अभिनय 
आठ वर्षांपासून ते मुंबई पोलिसांत सेवा देत आहेत. हे करत असताना अभिनयाची आवड असल्यामुळे लीलाधर पाटील यांनी मुंबईच्या चंदेरी दुनियेत आपल्या संपर्काच्या माध्यमातून पाय रोवला. अनेक मालिकांमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे. तसेच पुढील वर्षी सुनील शेट्टी आणि अजय देवगण यांच्यासोबत चित्रपटातही संधी चालून आली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे