लांडोरखोरी जैविक वारसा क्षेत्र घोषित होणारः वन्यप्रेमींच्या पाठपुराव्याला यश ! 

लांडोरखोरी जैविक वारसा क्षेत्र घोषित होणारः वन्यप्रेमींच्या पाठपुराव्याला यश ! 

जळगाव  : शहरालगत लांडोरखोरी येथील वनक्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. यामुळे स्थानिक वन्यप्रेमींच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 


चेन्नईच्या राष्ट्रीय जैविक विविधता मंडळाकडून जैविक वारसास्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर आता गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, अशी माहितीही वनमंत्री राठोड यांनी दिली. 

मोरांचे अधिवास क्षेत्र 
वनक्षेत्राच्या अखत्यारीत व मेहरूण तलावालगतचे लांडोरखोरी हे क्षेत्र मोर पक्षाचे अधिवास होते. त्यामुळे लांडोरखोरी हे नाव पडले आहे. लांडोरखोरी वनोद्यान ४८.०८ हेक्टर क्षेत्रावर जैवविविधतेने नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यांसारख्या ७० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत, तर रानडुक्कर, चिंकारा, नीलगाय, ससा, मुंगूस, मोर यांसारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलियन, धामण, कवड्या, तस्करसारख्या सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या १५ पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या ६८ प्रजाती येथे आढळून येतात. या क्षेत्रापैकी १० हेक्टरमध्ये हे वनोद्योन विकसित केले आहे. 

लांडोरखोरी आणि मेहरूण तलाव क्षेत्राला जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जैवविविधता कायदा-२००२ कलम-३५ मध्ये याविषयीची तरतूद आहे. त्यासाठीही पाठपुरावा करू. 
-राजेंद्र नन्नवरे, पर्यावरणप्रेमी 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com