esakal | ग्रामपंचायत निवडणूक : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस 
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस 

जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रभागरचना झाल्यानंतर आता मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात अनेक मतदारांनी चुका असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील ८७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल अद्याप वाजायचा बाकी आहे. मात्र त्यातील मतदारयाद्यांत प्रचंड चुका, दुबार दावे, मृतांची नावे न वगळणे आदी अशा दोन हजार २९७ तक्रारी मतदारांनी केल्या आहेत. तक्रारींचा पाऊस पडला असला तरी त्यात लगेचच फेरबदल करून नव्याने मतदारयाद्या तयार करण्यात येतील का? याबाबत मतदारांमध्ये शंका आहे.

आवश्य वाचा- वऱ्हाडीच्या अंगावर खाजेची वस्तू टाकून लाखोच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला 

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अंतिम मतदारयादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. कोरोना संसर्गामुळे मार्च २०१९ पासून जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मार्च, एप्रिलमध्ये होत्या. त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रभागरचना झाल्यानंतर आता मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र त्यात अनेक मतदारांनी चुका असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यावर संबंधित तालुका प्रशासन निर्णय घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहे. 


जळगाव तालुक्यात महत्त्वाच्या ग्रामपंचायती 
जळगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण व लोकसंख्या दहा हजारांवर असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात तरुणांत जोश आहे. जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदी. 

वाचा- बीएचआर’ घोटाळ्यातील ‘म्होरक्या’ला पोलिस कधी पकडणार ?

तालुकानिहाय तक्रारी अशा 
तालुका--तक्रारी 
जळगाव--६३८ 
जामनेर--९७ 
धरणगाव--७० 
एरंडोल--१२ 
पारोळा--२१२ 
भुसावळ--३६ 
मुक्ताईनगर--४४ 
बोदवड--४८ 
यावल--१९० 
रावेर--१८८ 
अमळनेर--९३ 
चोपडा--४२ 
पाचोरा--१०४ 
भडगाव--१४३ 
चाळीसगाव--३८० 
एकूण--२२९७ 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top