esakal | आमच्या विजयांमूळे ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू- गिरीश महाजन
sakal

बोलून बातमी शोधा

आमच्या विजयांमूळे ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू- गिरीश महाजन

कोरोनानंतर पहिल्या निवडणूक ही होती त्यामुळे सरकार विरोधी जनमत बदलत जात असल्याचे हे संकेत आहे. या सरकारबाबत उद्या सकाळ पर्यंत असंतोष दिसेल.

आमच्या विजयांमूळे ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू- गिरीश महाजन

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः धुळे- नंदूरबार, पुणे, नागपुर, औरंगाबाद या विधान परिषदेच्या चार जागा आम्ही जिकंणार आहोत. तसेच शिक्षक मतदार संघातून देखील एक जागेवर विजय होईल. कोरोनानंतर पहिली निवडणुकांमध्ये या तिन पक्षाच्या सरकारबाबत असंतोष दिसत आहे. त्यामुळे आमच्या विजयामूळे ठाकरे सरकारचे काउंटडाऊन सुरू झाले असल्याचा दावा भाजपचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.

आवश्य वाचा- उद्योजकांसाठी चांगली बातमी: जळगावात ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार

धुळे-नंदूरबार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार भाजपने घेतली. या वेळी पुढे बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, की धुळे-नंदूरबारचा निकाल आमच्या बाजूने येणार, किती मते विरोधकांना मिळणार, आम्हाला मिळणार हे आम्हाला माहिती होते. त्यानुसार अमरीशभाई पटेलांचा विजय झाला आहे. याबाबत एक दिवस आगोदर धुळे येथून जावुन आढावा घेतला होता. महाविकास आघाडीचे १५ ते १६ जागा भाजपेक्षा जास्त असतांना त्यांचे ११७ मतं फुटली आणि आणच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कोरोनानंतर पहिल्या निवडणूक ही होती त्यामुळे सरकार विरोधी जनमत बदलत जात असल्याचे हे संकेत आहे. या सरकारबाबत उद्या सकाळ पर्यंत असंतोष दिसून येईल असे महाजन म्हणाले.   

खडसे गेल्याचा फरक पडणार नाही
एकनाथ खडसेंनी भाजप सोडले तेव्हा उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा फरक पडेल असेल बोलले जात होते. पण मी आधी पासून बोलत होतो की खडसे गेले तरी आम्हाला काही फरक फडणार नाही. त्यांची केवळ बोलायची कढी आणि बोलाचाच भात असा प्रकार आहे. 

वाचा- तलाठी आप्पाची रिेकॉर्डींग झाली व्हायरल; आणि त्‍यांची ततफफ.. 

  
टिम वर्क महत्वाचे ठरले
धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपची जागा येणार होती हे कार्यकर्त्यांच्या टिम वर्कचे यश आहे. पुणे, नागपुर, औरंगाबाद येथील जागांवरसुध्दा आमचे उमेदवार निवडणून येणार आहे. तर शिक्षक मतदारसंघातसुध्दा एक जागा निवडणून येणार आहे. त्यामुळे तीन पक्षाच्या सरकारकाच्या बाजूने लोक उभे राहत नसल्याचे यातून दिसत आहे. 

loading image
go to top