‘महावितरण’ची डिस्‍काउंट ऑफर...बिल भरताना ग्राहकांना असा आहे फायदा...

nahaviran
nahaviran

जळगाव : गेल्‍या काही महिन्यांपासून बिलांबाबत प्रचंड तक्रारी येत आहेत. मार्च महिन्यानंतर अर्थात लॉकडाउनच्या काळात सरासरी बिलाची आकारणी झाल्‍याने सर्वच ग्राहकांना जास्‍तीचे बिल आले आहे. यातच एप्रिलपासून युनिटचे दर वाढल्‍याने अव्वाच्या सव्वा बिल आली आहे. यामुळे ग्राहकांकडून बिल भरले जात नसल्‍याने थकित बिलांची रक्‍कम देखील वाढली आहे. मात्र आता बिल वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांना चक्‍क डिस्‍काउंट ऑफर दिली जात असून, याकरीता तीन- चार महिन्यांचे थकलेल्‍या बिलाची एकत्रित रक्‍कम भरल्‍यानंतर सवलत देण्यात येणार आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्यास सुरवात झाल्‍यानंतर देशात लॉकडाउन पुकारण्यात आला होता. अर्थात २२ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्‍याने या काळात महावितरण’ने देखील रिडींग घेणे किंवा बिल वाटप करण्याची प्रक्रिया थांबविली होती. मात्र या काळात ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी करण्यात आली होती. यामुळे ग्राहकांना मिळालेल्‍या बिलाची रक्‍कम खुप मोठी होती. इतकेच नाही तर अनेकांनी ऑनलाईन बिल भरल्‍यानंतर देखील जुनमध्ये रिडींग घेवून आकारण्यात आलेले बिल देखील अधिक होते. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्‍या आणि बिल भरण्याचे थांबविले. 

आता महावितरणची ऑफर 
ग्राहक बिल भरण्यास तयार नसून, बिल कमी करून मिळण्याबाबत मागणी केली जात आहे. दरम्‍यान याकरीता ‘महावितरण’ने ठिकठिकाणी शिबिर लावण्यात आले असताना देखील ग्राहकांचे समाधान झाले नाही. यामुळे आता ‘महावितरण’ने बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर दिली आहे. यात मागील तीन- चार महिन्यांचे ज्‍यांचे बिल थकलेले आहे. त्‍यांनी संपुर्ण रक्‍कम एकत्रित बिल भरल्‍यास बिलात दोन टक्‍के सवलत देण्यात येणार आहे. अर्थात दोन टक्‍के रक्‍कम ही अगदी अल्‍प आहे. या व्यतिरिक्‍त एकत्रित बिल भरू न शकणाऱ्या ग्राहकांना रक्‍कमेचे तीन हप्ते पाळून देण्यात येत आहेत. याकरीता ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश देखील पाठविण्यास सुरवात झाली आहे. 

वाढीव बिलाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा 
ग्राहकांना मिळालेले अव्वाच्यासव्वा बिलाची एकत्रित रक्‍कम भरणे सध्याच्या काळात तरी शक्‍य नाही. यात १ एप्रिलपासून विजेच्या प्रतियुनिट दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे वाढीव बिल आणि नवीन दरानुसार झालेल्‍या आकारणीमुळे जास्‍तीचे बिल आले आहेत. बिलाची ही रक्‍कम कमी करून त्‍यात किमान दहा टक्‍के सवलत देण्याच्या दृष्‍टीन वरिष्‍ठ पातळीवर बोलणी सुरू असल्‍याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com