गिरीश महाजनांना धमकी देणारा निघाला पाचोरा बस डेपोचा कंडाक्टर  

भूषण श्रीखंडे
Friday, 16 October 2020

गिरीश महाजन यांचे स्विससहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येवून चारी ही बाजूने बाँम्ब लावले असून पाच वाज्यापर्यंत एक करोड पाठव अन्यथा बाँम्ब स्पोट करेल.

जळगाव ः जामनेर येथील माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या ग्लोबल मल्टिस्पेशलटी हॅास्पीटलच्या उघाटन कार्यक्रम प्रसंगी नुकताच झाला. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी महाजनांच्या स्वियसहाय्यकाला एक अज्ञात फोन येवून कार्यक्रम ठिकाणी बाँम्ब लावले असून एक कोटी रुपये दे नाहीत बाँम्ब ब्लास्ट करण्याची धमकी मोबाईलवर व टेक्स मॅसेज आला होता.

आवश्य वाचा- महाराष्ट्र हादरला: जळगावमध्ये चार चिमुकल्यांची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या !

या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनुसार सायबर क्राईम व स्थानीक गुन्हे शाखेच्या व जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध लावत धमकी देणाऱया व्यक्तीला पकडले आहे. धमकी देणारा व्यक्ती जामनेर तालुक्यातील पहुर येथील रहिवासी तर पाचोरा एसटी डेपो येथील बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. 

जामनेर येथील गिरीश महाजन यांच्या हॅास्पीटलचे उदघाटन फडवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूवी गिरीश महाजन यांचे स्विससहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येवून चारी ही बाजूने बाँम्ब लावले असून पाच वाज्यापर्यंत एक करोड पाठव अन्यथा बाँम्ब स्पोट करेल अशी धमकी दिली होती. या प्रकरणी जामनरे येथे तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सायबर क्राईम, स्थानीक गुन्हे शाखा व जामनेर पोलीस स्ठेनचे असे तीन पथक नेमले होते. त्यानुसार पथकाने पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, पहुर परिसरात संशयीताचा शोध घेतला. लोकांशी केलेली विचारपुस तसेच तांत्रिक पद्धतीने शोध घेवून आरोपी राजू देशमुख (वय ३२) पहुरपेठ, ता. जामनेर हा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला गुरूवारी अटक करण्यात आली असून अटकेवेळी त्याच्याजवळ तेरा मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी पाचोरा डेपो येथे बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. आरोपीला न्यायालयात आरोपीस हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे. 

वाचा- रावेर हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या शोधांसाठी तीन पथक रवाना !  

तपास करणाऱया पथकात जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, एलसीबीचे पोलीस पोलीस निरीक्षक बापू रोहम, जामनेर पोलीस स्टेशनचे फौजदार किशोर पाटील, हेड कॅान्सटेबल रमेश कुमावत, राहूल पाटील, किशोर पाटील, रमेश कुमावत, राहूल पाटील, आसिफ फठाण, विजयसींग पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांनी कामगिरी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Man arrested for threatening to blow up Girish Mahajan