esakal | सज्‍जता..विना मास्क फिरणाऱ्या ३४ जणांवर कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

no mask use

महापालिका प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यांवर तोंडाला विना मास्क फिरणाऱयांवर कारवाई गेल्या दोन दिवपासापासून सुरू केली आहे.

सज्‍जता..विना मास्क फिरणाऱ्या ३४ जणांवर कारवाई 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : कोरोनाचा दुसरी लाट वाढत असून जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना तोंडाला विना मास्क लावून फिरणाऱया ३४ जणांवर आज महापालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच फुले मार्केट मध्ये होणारी गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून आज सायंकाळी सहाययक पोलिस अधिक्षकांनी पाहणी करून हॉकर्स तसेच गर्दी, तसेच कोरोना संरक्षणाचे नियम न पाळणाऱयावर देखील आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे. 

जळगाव शहरात गेल्या दिड दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. परंतू दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आता कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यांवर तोंडाला विना मास्क फिरणाऱयांवर कारवाई गेल्या दोन दिवपासापासून सुरू केली आहे. आज देखील ३४ जणांवर दंडात्मक कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. 

फुले मार्केटची केली पाहणी 
सायंकाळी उपायुक्त संतोष वाहुळे व सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी फुले मार्केटचींही पाहणी केली. यात फुले मार्केटसमोरील हॉकर्सवर तसेच वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासन आता कडक पावले उचलणार आहे. तसेच वेळ प्रसंगी गुन्हा देखील पोलिस प्रशासन दाखल करणार आहे. 

हॉकर्सवर कारवाई 
फुले मार्केट येथील अनधिकृत हॉकर्सवर आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकाने १० हॉकर्सवर कारवाई करत साहित्य जप्त केले. त्यानंतर फुले मार्केटमध्येच रस्त्यावर दुकान  मांडून व्यवसाय करणाºयांवरही कारवाई केली. चौबे मार्केटमधुनही रस्त्यावर हातगाड्या लावणºया दोन जणांच्या हातगाड्या जप्त केल्या. अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये एकच पळापळ झाली. तसेच दुपारनंतर फुले मार्केटमध्ये विना मास्क फिरणाऱया पुरूष व महिलांसह ३४ जणांकडून २०० रूपये प्रमाणे दंड वसुल केला.