अत्यावश्‍यकसह इतरांनाही मिळावी "लॉकडाउन'मधून सूट 

fule market
fule market

जळगाव : देशात सर्वत्र लॉकडाउन सुरू असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार बंद आहे. लॉकडाउनची मुदत देखील आता संपत चालली असून अत्यावश्‍यक सेवेला देण्यात आलेल्या वेळेप्रमाणे इतर उद्योगांना देखील वेळ निश्‍चित करून दुकाने खुली करून व्यापाऱ्यास करण्यास सूट देण्याची मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी केली. 

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. देशात आता पाचवा लॉकडाउन सुरू झाला असून यामध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहे. गेल्या साठ दिवसांपेक्षा अधिक दिवस देशासह जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार ठप्प असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वच उद्योगधंदे बंद पडलेले आहे. पाचव्या लॉकडाउमध्ये शासनाकडून उद्योग व व्यापारासाठी कुठल्या अटी व नियम लागू करण्यात आल्या आहेत. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

व्यापाऱ्यांना शिथिलता आवश्‍यक 
लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून देशभरातील व्यापार, उद्योग पूर्ववत करण्यासाठी आता काही प्रमाणात सर्व व्यवहार व उद्योगांना शिथिलता देणे आवश्‍यक आहे. अगोदरच संपूर्ण सण, उत्सवांमध्ये होणारी उलाढाल लॉकडाउनमुळे बंद असल्याने संपूर्ण प्रत्येकाचे आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा परिणाम व्यापाऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. 

वेळ निश्‍चित करावी 
लॉकडाउनच्या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यांना देखील शासनाकडून वेळ निश्‍चित करून देण्यात आली होती. त्याप्रमाणे लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यास त्यांना देखील अत्यावश्‍यक सेवेप्रमाणे वेळ निश्‍चित करून द्यावी. 

सम विषमची अंलबजावणी करावी 
लॉकडाउन मध्ये इतर व्यापार उद्योगांना शिथिलता मिळाल्यास गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने इतर जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या सम विषम या प्रमाणे दुकाने उघडण्यास मुभा देण्यात यावी. 

दोन महिन्यांपासून व्यवहार ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. दिवसभरात शासनाने व्यापार व उद्योग करण्यासाठी वेळ निश्‍चित करून द्यावी. त्याप्रमाणे आम्ही आमचा व्यवसाय करू, शासनाने घालून दिलेल्या नियमांची देखील अंमलबजावणी काटेकोरपणे करू. 
मुकेश तेजवानी, व्यापारी. 

अगोदरच व्यापारात मंदी सुरू होती, त्यामध्ये दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने इतर जिल्ह्यांमध्ये ज्या प्रमाणे सम विषम पद्धतीने व्यवहार सुरू केले आहे. त्याप्रमाणे जळगावात देखील व्यापाऱ्यांना सूट देवून सम विषम पद्धतीने सूट द्यावी. जेणे करून काही प्रमाणात उद्योगांना देखील बळ मिळेल. 
-सतीश साहित्या, व्यापारी. 

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दुकाने बंद असल्याने आमच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना आता पगार देण्यासाठी पैसे शिल्लक नाही. आम्ही होलसेल व्यापारी असून आम्हाला दिवसातून काही वेळ तरी सूट देण्यात यावी. जेणे करून आम्ही दुकानाचे भाडे व कर्मचाऱ्यांचे पगार सुरळीत करू शकू. 
-राम भागवानी, होलसेल व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com