'मी'च पुन्हा येईलचा आला होता तिटकारा..! -संजय राऊत

महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांचीच ईच्छा होती.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautMP Sanjay Raut


जळगाव : पाच वर्षे भाजप (BJP) सोबत सत्तेत असतांना पदाधिकारी कार्यकर्तेच नाही तर, माझ्याही सारखा माणुस अस्वस्थ झाला होता. अशात मीच पुन्हा येईल याची गर्जना झाली ती इतकी की झाली की तिचा तिटकारा येऊ लागला. अशातच पहाटेचा तो शपथवीधीचा प्रसंग पाहून तुम्हीच नाही तर, मी देखील गोंधळलो. मात्र, जेष्ठ नेते शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar) यांच्याशी झालेल्या बोलण्यातून विश्वास वाढला होता. आणि २४ तासात अजित दादा सातच्या (Ajit Pawar) आत घरात आले. महाराष्ट्रात सेनेचा मुख्यमंत्री (CM) व्हावा ही बाळासाहेबांचीच (Balasaheb Thackeray) इच्छा होती, असे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यावेळी कार्यकर्त्या मेळाव्यात बोलतांना म्हणाले.(mp sanjay raut explanation on devendra fadnavis sentence)

MP Sanjay Raut
दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमले नव्हे..!

संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्र दौर्र्यावर असून रात्री मुक्कामी थांबल्यावर आज सकाळ पासूनच हॉटेल रॉयल पॅलेसच्या सभागृहात कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याला सुरवात झाली. स्थानीक आमदार आणि जळगाव-रावेर लोकसभेच्या जांगासाठी केाव्हीड संपल्यावर जिल्‍हा पिंजुन काढत तयारी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी दोन्ही कार्यकर्ते मेळाव्या प्रसंगी ग्वाही देत या जागा शिवसेनेला मिळाव्या अशी मागणी केल्यावर त्यांच्या मागणीला श्री राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माजीही इच्छा असल्याचे सांगत अनुमोदन केले. जळगाव शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथे कार्यकर्ते पदाधिकार्यांनी खच्चुन भरलेल्या सभागृहात झालेल्या या कार्यकर्ते मेळाव्या प्रसंगी व्यासपिठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे नवनियुक्त पदाधिकारी विष्णु भंगाळे, डॉ.हर्षल माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपालीकांवर भगवा फडकवणार

यावेळी बोलतांना पाणीपुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटिल म्हणाले की..उगाच आम्ही ही मागणी करत नसुन जळगाव, धरणगाव, पाचोरा, भडगाव येथे आपली सत्ता आहे. एकुण सात नगर पालीकांमध्ये ५० च्यावर नगरसेवक आपले आहे, भविष्यात अमळनेर आणि चाळीसगाव नगरपालीकांवर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, आठ तालूक्यात ७२३ गावे आहेत, प्रत्येक घरात शिवसेना कार्यकर्ता असून थोडी ताकद लावली तर निश्चीतच आपण बदल घडवून आणू असा मला विश्वास असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी यावेळी अधोरेखीत केले.


MP Sanjay Raut
नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन

जळगावात शिवसेनेचा खासदार व्हावा अशी माझीही इच्छा

मुंबई-कोकणानंतर सर्वाधीक मजबुत संघटन असलेला जळगाव जिल्‍हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. ग्रामपंचायत, जिल्‍हापरीषद, नगरपालीका महानगर पालिकांसह सर्वाधीक आमदार जनतेने या जिल्ह्यातून निवडून दिलेले आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतांना जळगाव जिल्‍ह्‍याचे प्रतिनीधीत्व करणारा खासदार निवडून यावा अशी माझी देखील इच्छा असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्ता बैठकी दरम्यान बोलतांना सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com