दिल्लीचे शेतकरी आंदोलन केवळ राजकारण : खासदार उन्‍मेश पाटील

कैलास शिंदे
Sunday, 13 December 2020

केंद्र सरकारने कृषी विषयक मंजूर केलेले कायदे ही शेतकरी हिताचे आहेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या कायद्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे.

जळगाव : केंद्र शासनाने कृषी विषयक मंजूर केलेल्या तीनही कायद्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होईल; तसेच त्याला संरक्षण मिळेल, मात्र याबाबत सुरू असलेले दिल्लीतील शेतकरी आंदोलन म्हणजे केवळ राजकारण आहे. असे मत जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले.जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलन सुरू आहे. या कायद्याची जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभर पत्रकार परिषद घेण्यात येत आहेत. त्या अतंर्गत जिल्हा भाजपतर्फे आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी आदी उपस्थित होते. केंद्र सरकारने कृषी विषयक मंजूर केलेले कायदे ही शेतकरी हिताचे आहेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार आहे. खऱ्या अर्थाने या कायद्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या त्यात जमिनी जातील हा सुरू असलेला प्रचार अत्यंत चुकिचा आहे. त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार नाही तर केवळ त्याच्या मालाचा लिलाव होणार आहे. 
 
शेतकऱ्यांची दिशाभूल
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाबाबत ते म्हणाले कि, दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन केवळ राजकारण आहे. यात विरोधकांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळे आंदोलन सुरू आहे, या आदोलनात शेतकरी कमी आणि आडते व दलाल जास्त आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mp unmesh patil press and farmer strike in politics