नाथा भाऊंना महावितरणचा मोठा शॉक, तब्बल लाखाचे दिले बिल ! 

नाथा भाऊंना महावितरणचा मोठा शॉक, तब्बल लाखाचे दिले बिल ! 

जळगाव ः कोरोना मुळे देशात चार महिने लॉकडाऊन होते. त्यामुळे सर्व व्यापार, व्यवहार, कंपन्या बंद असल्याने नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना घरीच बसावे लागले होते. त्यात विविध क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचारी घरूनच काम करत होते. तर अनेक व्यवसाय बंद असतांना देखील महावितरणकडून अव्वाच्या सव्वा विजबिल देण्याच्या तक्रारी समोर अजून ही येत आहे. त्यात भाजपचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसेंना त्यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानाचे महावितरणे चार महिन्याचे १ लाख ४ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे.  

राज्यात चार महिने लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय बंद होते. त्यात या टाळेबंदीच्या काळात विजेचा वापर कमी असलेल्या सर्वसामान्य नागरिक शेतकरी तसेच बंद असलेले दुकाने, व्यवसायिकांना देखील महावितरणच्या गलथान कारभारामुळे वाढीव बिलांचा त्रास सहन करावा लागला. त्यात आता राजकीय नेत्यांना देखील महावितरणच्या अव्वाच्या सव्वा बिल बजाविण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेले एकनाथराव खडसेंना त्यांच्या मुक्ताईनगरातील निवास्थानाचे बिल महावितरणे नुकतेच बजाविले. या बिलाचा आकडा पाहता खडसेंना देखील आश्चर्याचा धक्का बसत निवास्थानी विजेचा ऐवढा वापर नसतांना तब्बल चार महिन्याचे १ लाख ४ हजार रुपये बिल आलेच कसे असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 

अव्वाच्या सव्वा बिले येताच कसे ?
सर्व सामान्य प्रमाणे आता राजकीय नेत्यांनाही महावितरणच्या वाढीव विज बिलांचा झळ सोसावी लागत आहे. खडसेंना मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं आलेले बिल हे एप्रिल ते जुलै अशा चार महिन्याच्या कालावधीचे आहे. घरात विजेचा वापर कमी असून इतकं वीज बिल आले कसे असे खडसेंकडून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

वाढीव बिलांवर सरकारने चौकशी करावी
राज्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक, दुकानदार तसेच व्यावसायिकांना लॉकडाऊनच्या काळात वाढीव विज बिल आल्याने मनस्ताप झाला आहे. या बाबत राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी, तसेच या बिलांमध्ये सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com