दुसऱ्याच्या पोटासाठी काम करणारे हमाल उपाशी... महापालिकेच्या केअर सेंटर मधील प्रकार ! 

दुसऱ्याच्या पोटासाठी काम करणारे हमाल उपाशी... महापालिकेच्या केअर सेंटर मधील प्रकार ! 

जळगाव ः हमाल दुसऱ्याच्या पोटासाठी काम करतो. मात्र त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली तर.. ते दुसऱ्यासाठी कसे काम करतील. उपासमारीची वेळ महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. 
जिल्हा पुरवठा विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयात गोडावून आहेत. तेथे तब्बल २५ ते ३० हमाल काम करतात. हे हमाल जिल्हाभरातील शासकीय गोदामात माल पाठविण्याचे काम करतात. अत्यावश्‍यक सेवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शासनाकडून आलेली पोती उतरविणे, मागणीनुसार जिल्हयातील प्रत्येक रेशन दुकानदाराच्या मालाप्रमाणे पोती वाहनात भरण्याची ते कामे करतात. 


या हमालांपैकी एकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने तो कामावर येत नाही.आपल्याला त्रास नको म्हणून या हमालांनी स्वतःहून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी धाव घेतली. वास्तविक अत्यावश्‍यक सेवेतील ही माणसे असल्याने त्यांचा अगोदर स्वॅब घेऊन त्यांना मोकळे केले पाहिजे. मात्र तसे करता त्यांना तेथेच दाखल करून घेतले. आज सकाळचा नाश्‍ता त्यांना चक्क साडेदहाला मिळाला. जेवणही लवकर मिळाले नसल्याने हमालाच्या मालकाने तयांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

आमचे स्वॅब अगोदर घ्या व आम्हाला सोडा असे हमालांनी डॉ.ठुसे यांना सांगितले. त्यांनी तो प्रकार महापालिकेचे डॉ.रावलानी यांना सांगितला. डॉ.रावलानी यांनी तालुक्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून ही हमाल माणसे अत्यावश्यक सेवेतील आहेत का? मद्यपान करतात, सिगरेट पितात ? असा आरोप करीत त्यांचे सांगून आताच त्यांचे स्वॅब घेतले जाणार नाही असे सांगितले. 

दरम्यान याहमालांचे गोडावूनमधून माल चढविणे व उतरविणे यांचे काम ठप्प झाले आहे. यामुळे जर रेशन दुकानात नसले तर नगारिकांना धान्य भेटणार नसल्याचे चित्र आहे. 

आज दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी स्वॅब न घेतल्याचा प्रकार इन्सीडंट कमांडंट, जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर यांना सांगितला. त्यावर त्यांनी तातडीने स्वॅब घेण्याची व्यवस्था केली. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची अशी अवस्था कोविड केअर सेंटरमध्ये होत असेल तर सर्वसामान्यांची काय दशा होतील हे न बोललेले बरे, असा सूर नागरिकांमध्ये आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com