मनपा ऍक्‍शनमोड मध्ये... "मेगा' अतिक्रमण कारवाई, 25 टपऱ्या जमीनदोस्त !

मनपा ऍक्‍शनमोड मध्ये... "मेगा' अतिक्रमण कारवाई, 25 टपऱ्या जमीनदोस्त !

जळगाव :  शहरातील गिरणा टाकी परिसरातील भाजी बाजारात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर मंगळवारी हल्ला केल्याची घटना सायंकाळी घडली होती. त्याप्रकारानंतर महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी गिरणा टाकी परिसरातील रस्त्यावरील सुमारे 25 टपऱ्यांचे अतिक्रमण काढून त्या जेसीपीच्या मदतीने जमीन दोस्त करण्यात आले. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यात "लॉकडाउन' शिथील नियमांध्ये शिथीलता करण्यात आली आहे. त्यानुसार फळ-भाजी विक्रेत्यांना सायंकाळी पाचपर्यंत वेळ देण्यात आली आहे. परंतु गिरणा टाकी परिसरात वेळ उलटून गेल्यानंतरही विक्री करणारे भाजीपाला, फळे व किरकोळ वस्तूच्या विक्रेत्यांवर कारवाई करत असतांना पथकावर चाकूने तसेच दगडफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आज सकाळीच धडक कारवाई करत उपायुक्त श्री. वाहूळेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. 

प्रभाग समिती कार्यालयाला अतिक्रमणच विळखा 
गिरणा टाकीजवळच्या प्रभाग समिती कार्यालयाच्या भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात टपऱ्यांचा विळखा होता. चार महिन्यापूर्वी तत्कालीन उपायुक्त अजित मुठेंनी या टपऱ्यांचे अतिक्रमण काढले होते. परंतू चार-पाच दिवसात पून्हा टपऱ्या त्याच जागेवर राजकीय व मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या वरद हस्तामुळे पून्हा आल्या होत्या. या ठिकाणी सलून, चहा-नाष्टा, चायनीज, पानटपऱ्या, गॅरेज, अंडाभूर्जी आदी व्यवसायाच्या टपऱ्या लागलेल्या होत्या. तर काही टपऱ्यावर सर्रास दारू पिणे, सट्टा आदी प्रकार येथे लाकडाऊन पूर्वी सुरू होता. 

25 टपऱ्या जमीन दोस्त 
गिरणा टाकीच्या भितीला लागून महापालिकेची ही मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय दिलेल्या वेळेत फिजीकल डिस्टन्सिंग व आदी नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती. परंतू दिवसे दिवस वाढत असलेले हॉकर्स, विक्रेते त्यात वाढणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी होती. त्यात काही विक्रेत्यांना मनपाचे व पोलिस कर्मचाऱ्यांचा आश्रय असल्याने या ठिकाणी हॉकर्सची मूजोरी वाढली होती. त्यात मनपाच्या अतिक्रमण पथकावर मंगळवारी हल्ला करण्यात आला. 

टपरी धारक थेट जेसीपी खाली झोपला 
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्या पथकाने सुरू केली. यावेळी सर्व टपऱ्यांचे अतिक्रमण काढून त्या जेसीपीने तोडण्यात आले. यावेळी एका अंडाभूर्जी विक्रेत्याने थेट जेसीपी खाली झोपून कारवाईला विरोध केला. तर काही टपरी धारकाने आम्हाला पूर्व सुचना द्यायला हवे होत्या असा उपायुक्‍तांशी शाब्दीक वाद घातला. कारवाई प्रसंगी अनेक टपरी धारकांना यावेळी आपल्या 
डोळ्यासमोर टपरी तोडली जात असल्याने रडू कोसळत होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत कारवाईचे काम सुरळीत केले. त्यामुळे तीन ते चार तास गिरणा टाकी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले होते. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम लावून दिले आहे याचे या ठिकाणी कोणीच अमंलबजावणी करत नव्हते. तसेच गर्दी होत असल्याची तक्रार नागरिकांची होती. त्यानुसार आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी मगळवारी आलो परंतू आमच्यावर हल्ला केला. त्यामुळे सर्व अतिक्रमण आज काढले आहे. 
संतोष वाहुळे, उपायुक्त. महापालिका. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com