esakal | जन्मताच बाळाला कोरोना; २७ दिवस लढा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona the baby at birth

जन्मताच बाळाला कोरोना; २७ दिवस लढा

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जिल्हा कोविड रुग्णालय) जन्मलेले बाळ कोरोनावर मात करून २७ व्या दिवशी यशस्वीरीत्या घरी परतले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी बाळाच्या आईला डिस्चार्ज कार्ड देऊन रुग्णालयातून निरोप दिला.

शहरातील तुकारामवाडी येथील रहिवासी अंशू योगेश चौधरी या कोविड पॉझिटिव्ह महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, म्हणून २९ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग विभागात दाखल करण्यात आले होते.

दुसऱ्या स्‍वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

बाळाचा पहिला स्वॅब निगेटिव्ह आला. परंतु बाळाचा श्वासाचा त्रास सुरूच होता. म्हणून हृदयाची तपासणी करून घेतली त्या तपासणीत atrial septal defect असल्याचे समजले. बाळाच्या पांढऱ्या पेशी खूप जास्त वाढल्याने व श्वासाचा त्रास वाढल्याने प्रोटोकॉलनुसार दुसरा स्वॅब सातव्या दिवशी पुन्हा पाठवला. तो पॉझिटिव्ह आला.

२७ व्या दिवशी डिस्‍चार्ज

नवजात शिशूची योग्य ती काळजी घेऊन कार्यरत स्टाफ व टीमने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले. २७ दिवसांनी ही बाळाची व एसएनसीयु टीमची झुंज यशस्वी ठरली. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. अखिलेश खिलवाडे, डॉ.शैलजा चव्हाण आदी वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले. आज २७ व्या दिवशी बाळ सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

loading image
go to top