esakal | ते दोन लव कपल लग्‍न लावून परतले अन्‌ घडले असे..

बोलून बातमी शोधा

love marriage
ते दोन लव कपल लग्‍न लावून परतले अन्‌ घडले असे..
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जामनेर (जळगाव) : प्रियकरासोबत लग्नाला विरोध म्‍हणून पळून जाऊन लग्न केले. लग्‍न केल्‍यानंतर पोलीस ठाणे गाठून घरच्यांना याबाबत कल्‍पना आल्‍याने गाव सोडून अन्य ठिकाणी जावून संसाराला सुरवात करण्याचा निर्णय त्‍या जोडप्यांनी घेतला. असे एक नव्हे तर दोन जोडप्यांनी केले..

जामनेर तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीला २३ एप्रिलला हळद लागणार होती. पण तिचे गावातील एका तरुणावर प्रेम होते. घरच्यांना याबाबत माहिती होती; मात्र त्‍या तरूणासोबत लग्‍न करण्यास घरच्यांचा विरोध होता. हे पाहून दोघांनी हळदीच्या आदल्‍या दिवशीच गाव सोडले. मुलगी अचानक घरातून गायब झाल्‍याने आई- वडील चिंतेत पडले. चिंतातुर पालकांनी तिचा शोध घेतला. मात्र कुठेही सापडून आली नाही. अखेर पालकांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली.

अन्‌ ती लग्‍न लावून परतली

हळदीच्या आदल्‍या दिवशी घरातून गायब झालेली तरूणी प्रियकरासोबत आली. त्या तरुणीचा ज्‍या दिवशी विवाह होणार होता. त्‍याच दिवशी दुपारीच ती पोलीस ठाण्यात प्रियकरासोबत लग्न करून हजर झाली. पोलिसांनी पालकांना बोलावले, मात्र तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला.

ओळखीतून प्रेम बहरले

तरुणीचा साखरपुडा ठरला होता. तिची ओळख गावाजवळील एका तरुणाशी झाली. त्‍यांच्या ओळखीतून प्रेम बहरले. मात्र पालकांनी ठरवलेल्या तरुणाशीच विवाह करावा लागेल, या चिंतेने तिने त्या तरुणासोबत गाव सोडले व आज लग्न करून पोलीस ठाणे गाठले.

ते प्रेमी युगल गाव सोडून गेले

पोलिसांनी पालकांना बोलावले. घरी जाण्यास नकार देतानाच त्या तरुणीने चक्क पोलीस संरक्षण मागितल्याने पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी जबाब नोंदवून घेत अखेर या दोन्ही घटनेतील प्रेमी युगलांनी पोलिसांसमक्ष गाव सोडून इच्छितस्थळी जाणे पसंद केले.