सव्वा महिन्यात केवळ २३ टक्के पाऊस; तरी सिंचनप्रकल्पात ४० टक्के जलसाठा 

सव्वा महिन्यात केवळ २३ टक्के पाऊस; तरी सिंचनप्रकल्पात ४० टक्के जलसाठा 

जळगाव  ः पावसाळ्याचा तब्बल सव्वा महिना उलटला तरी जिल्ह्यात २३.७० टक्के पाऊस झाला आहे. काही भागात समाधानकारक पावसाची हजेरी असली तरी काही भागात अद्याप पाऊस हवा तसा झाला नाही. यामुळे पेरण्यांवर संकट आ-वासून उभे आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमीच झाला. तरीही सिंचन प्रकल्पात सरासरी ४० टक्के जलसाठा आहे. 

चार दिवसांपासून पावसाची हुलकावणी 
गतवर्षी जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला होता. जुलैत चांगला पाऊस झाल्याने पेरण्या शंभर टक्के पूर्ण झाल्या. यंदा मात्र गेल्या पाऊस समाधानकारक असला तरी पेरण्याच्या वाढीसाठी आणखी पावसाची गरज आहे. ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या मंगळवारपासून पावसाने ओढ दिली आहे. सायंकाळी आकाशात ढग गर्दी करतात. काळेकुट्ट आकाश होते. नंतर मात्र वाऱ्यामुळे ढग दुसरीकडे निघून जातात. पाऊस पडत नाही. असा खेळ चार दिवसांपासून सुरू आहे. 

 
जिल्ह्यातील प्रकल्पात पाणी साठा असा 
धरण--पाणीपातळी (दलघमी)--टक्केवारी--गतवर्षीची टक्केवारी (२०१९) 
हतनूर--२०९.५२--१८.५९--११.६९ 
गिरणा--३९०.१५--३७.९५--० 
वाघूर--२३१.९५--७२.३४--१.६३ 
मध्यमप्रकल्प 
अभोरा--३१५.८०--६८.५०--३३.४६ 
मंगरूळ--३३०.८०--९०.१४--१.०८ 
सुकी--३६९.७८--७४.९२--२०.१२ 
मोर--३२१.२५--६३.२५--२१.९७ 
अग्नावती--२९६.०३--३५.२०--० 
हिवरा--२८५.३९--९९.८५--० 
बहूळा--२४९.३२--०--० 
तोंडापूर--३८२.६२--५८.७०--७९.८८ 
अंजनी--२२३.९०--३१.२४--० 
गुळ--२६४.८१--५८.०८--१७.९३ 
भोकरबारी--२३४.०--६.९८--० 
बोरी--२६६.२५--७३.०४--० 
मन्याड--३६९.३०--२५.९१--० 


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com