पालच्या बोरघाटात रस्तालूट; पिता-पुत्राच्या जीपवर दगडफेक

यू पॉइंटजवळ रस्त्यात झाडाची फांदी आडवी टाकून त्यांची गाडी अडवली व त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकून घेतला.
crime
crimecrime

सावदा : पाल बोरघाटात रस्ता अडवून लूट केल्याची घटना घडली आहे. पाल येथील लीलाधर टीकाराम भंगाळे हे मुलासह त्यांच्या जीपने काम आटोपून पालकडे जात असताना पाच जणांनी बोर घाटातील यू पॉइंटजवळ रस्त्यात झाडाची फांदी आडवी टाकून त्यांची गाडी अडवली व त्यांच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकून घेतला. याप्रकरणी सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

साधारणत: पाच, सहा दरोडेखोरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर झाडाची फांदी आडवे टाकून वाहनचालक लीलाधर भंगाळे, जयेश भंगाळे यांची महेंद्रा कंपनीची जीप (एमएच १९, सीवाय ११०५) अडवून १५ हजार २०० रुपये रोख व मुलाकडील नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल दमदाटी करून हिसकावून नेला व गाडीवर दगडफेक केल्याने गाडीच्या समोरील काच फुटून नुकसान झाले आहे.

crime
ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !

अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर फरार...

घटनेची माहिती मिळाल्यावर तत्काळ हवालदर राजेंद्र राठोड, संदीप धनगर आणि नरेंद्र बाविस्कर घटनास्थळी गेले. या पोलिस कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा शोध घेतला असता, अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास इंगोले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी दोन पथके तयार केली असून, तपास सुरू आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com