अटक करून सोडल्यावर तेच धंदे...पोलिसांनी त्या चौदा जणांचा केला असा बंदोबस्त 

haddpar
haddpar

जळगाव : जळगाव शहरात खुन, चाकू हल्ले, हाणामाऱ्यांचे प्रकार नित्त्याचे झाले आहे. चालता-बोलता सामान्यांच्या खुनाच्या घटना घडू लागल्या असून लॉकडाऊन काळातही खुनाचे प्रकार घडल्याने जिल्हा पोलिसदल ऍक्‍शन मोडवर आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी आपल्या अधीकाराचा वापर करुन कांचननगर डॉन निलू आबा सह त्याच्या टोळीतील एकुण चौदा गुंड-गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले असून रविवारी संध्याकाळी या प्रकरणी आदेश पारित करण्यात आले आहेत. 

जळगाव शहरात कुणालाही चाकू मारणे चॉपरने, हल्ला चढवण्याच्या घटना वाढत असून सहज कोणाचाही खुन करुन टाकण्या इतपत गुंडाची हिंमत वाढली आहे. शहरातील काही टोळ्या अद्यापही गुन्हेगारीत सक्रिय असून अपहरण, प्राणघातक हल्ले आणि छुप्या गॅंगवारचे प्रकार नित्याचे झाले आहे. कांचन नगर, जैनाबाद परिसरातील निलू अबा ऊर्फ निलेश युवराज सपकाळे याच्यासह विवीध 6 गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेले चौदा टोळी सदस्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलिस अधीनियम सन-1951 चे कलम-55 अन्वये दोन वर्षांसाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. 

हद्दपार टोळी अशी 
निलेश ऊर्फ लोमेश युवराज सपकाळे ऊर्फ निलू आबा :- टोळी प्रमुख (रा.जैनाबाद) रुपेश मनोहर सोनार, (रा.मोहन टॉकीज जवळ), मुन्ना ऊर्फ रतीलाल संतोष सोनवण (रा.जैनाबाद),युवराज नामदेव सपकाळे (रा.जैनाबाद), शामकांत आनंदा कोळी (रा.हरीओमनगर), आकाश युवराज सपकाळे (रा.जैनाबाद), शुभम रघुनाथ तायडे (रा.जैनाबाद), गणेश दिलीप सोनवणे (रा.जैनाबाद), शाहरुख ऊर्फ डॉलर खलील अली मोहम्मद शकिल (रा.गेंदालालमील), अनिल लक्ष्मण घुले (रा.रामेश्‍वर कॉलनी), संदिप ऊर्फ राधे संतोष शिरसाठ (रा.सुप्रीम कॉलनी), अमोल छगन कोळी (रा.एमआयडीसी), विकी नरेंद्र पाटिल (रा.एमआयडीसी), विशाल लक्ष्मण सोनार (रा.आयोध्यानगर) अशा चौदा अट्टल गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. 

दाखल गुन्हे अटक व सुटका 
हद्दपार करण्यात आलेल्या टोळी विरुद्ध दंगल, मारहाण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, रस्ता अडवणे, बेकायदा शस्त्र बाळगुन धाक निर्माण करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे विवीध पोलिस ठाण्यात दाखल असून दाखल गुन्ह्यात अटकेनंतर जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा तेच गुन्ह्याचा प्रकार वारंवार घडतो. प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील संशयीतांवर त्याचा परिणाम जाणवत नसल्याचे पोलिस अधीक्षकांनी हद्दपारीच्या नोटीस मध्ये नमुद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com