‘बीएचआर’ घोटाळ्यातील ‘म्होरक्या’ला पोलिस कधी पकडणार ? 

कैलास शिंदे | Wednesday, 9 December 2020

एक लाभार्थी नेता एक नेता ‘बारामती’येथे गेल्याची चर्चा असल्याचे सांगून ते म्हणाले, कि तो नेता बारामतीला गेल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्यांना आमच्या नेत्यांनी भेट दिलेली नाही.

जळगाव : ‘बीएचआर’पंतसंस्थेतील ठेवीदार गैरव्यवहार प्रकरणातील पकडलेले आरोपी प्यादे आहेत. त्यांचा ‘म्होरक्या’ कधी पकडणार, असा प्रश्‍न माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणी संबधितांवर कारवाई करण्यात यावी यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आवश्य वाचा- चक्क ‘कलेक्टर’च उतरले महामार्गाच्या पाहणीसाठी ! -

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कि बीएचआर पतसंस्था घोटाला प्रकरणात ठेवीदारांच्या पावत्यांचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आहे. तसेच, पतसंस्था कर्जदारांच्या मालमत्ता कमी किमतीत खरेदी करण्यात आलेल्या आहेत. यात मोठा गैरव्यवहार आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, ते केवळ प्यादे आहे. जे फरारी आहेत, त्यांनाही पकडण्याची गरज आहे. यात त्यांचा म्होरक्याही फरारी आहे. मात्र, पोलीसांनी अद्यापही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. या प्रकरणी तातडीने कारवाई करावी या मागणीचे पत्र आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देणार आहोत. 

Advertising
Advertising

वाचा- चोपड्यात कापूस ‘कटती’तून शेतकऱ्यांची लूट सुरूच ! -  
 

शरद पवार हेच नेते 
एकनाथ खडसे हे प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आले, त्यावेळी अनुपस्थित राहिल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, आपण कोणावरही नाराज नाही. जाहिरातीत आपला फोटो टाकला नाही म्हणूनही आपण नाराज नाही. त्या दिवशी आपण बाहेरगावी गेल्यामुळे येवू शकलो नाही. पक्षात आपले कोणतेही हेवेदावे नाहीत. शरद पवार हे आमचे एकमेव नेते आहेत. त्यांच्या खाली आणि वरही कोणताही नेता नाही. आम्ही सर्व त्यांचे शिलेदार आहोत. त्यामुळे आम्ही मनापासून एकदिलाने कार्य करणार आहोत. 

‘बारामती’त गेलेला तो नेता कोण? 
‘बीएचआर’ पतसंस्था प्रकरणातील एक लाभार्थी नेता एक नेता ‘बारामती’येथे गेल्याची चर्चा असल्याचे सांगून ते म्हणाले, कि तो नेता बारामतीला गेल्याचे सांगितले जात आहे, परंतु त्यांना आमच्या नेत्यांनी भेट दिलेली नाही,त्यामुळे अशां कोणालाही आमचे नेते भीक घालणार नाहीत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे