महसूल आयुक्त म्हणतात पोलिसांनी वाळू माफीयांना केले हद्दपार 

देविदास वाणी | Wednesday, 25 November 2020

वाळू चोरी प्रकरणात कारवाई झालेली आहे. वाळूचोरी करणाऱ्या दोन तीन टोळ्या सक्रीय आहे. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे.

जळगाव ः जिल्हयातील वाळू चोरीच्या तक्रारी आता बंद झालेल्या आहेत. पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा बंदोबस्त केला आहे. वाळू चोरणाऱ्या ज्या टोळ्या होत्या त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. आगामी आठवड्यात वाळू गटांच्या लिलावांना राज्य पर्यावरण समितीकडून परवानगी मिळेल. अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज दिली. 

आवर्जून वाचा- जळगावचा ‘फौजदार’अजय देवगण, सुनील शेट्टी सोबत करणार अभिनय
 

‘दोन दिवसापासून ‘वाळूचे अर्थकारण’ अशी मालिका दैनिकात सुरू होती. त्याची दखल घेत आज महसूल आयुक्तांनी सकाळीच जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांकडून वाळू माफीयांवरील कारवाईचा, वाळू चोरी बाबत दाखल गुन्हे, दंडाचा आढावा घेतला. नंतर पत्रकारांना माहिती दिली. 

Advertising
Advertising

जिल्ह्यात वाळूची मध्यरात्रीनंतर सर्रास चोरी होत असून रेती सोन्याच्या दरात विकली जात आहे. यावर प्रकाश झोत टाकला होता. आज विभागीय आयुक्त गमे यांना वाळू चोरी, वाळू गटांचे रखडलेले लिलाव याबाबत विचारणा केली असता त्यांनी वरील माहिती दिली. 

 

आवश्य वाचा- उद्योजकांना वाढीव प्रोत्साहन योजनेचा लाभ; उद्योगमंत्री सुभाष देसाईंचे आश्वासन -

आयुक्त गमे म्हणाले, की वाळू चोरी प्रकरणात कारवाई झालेली आहे. वाळूचोरी करणाऱ्या दोन तीन टोळ्या सक्रीय आहे. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे. त्यांचे अपील माझ्याकडे आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिस पथकांची नियुक्ती केली आहे. वाळू चोरीला पूर्ण आळा असेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.