esakal | आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, ते स्वःताहून पडेल- गिरीश महाजन 
sakal

बोलून बातमी शोधा

आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, ते स्वःताहून पडेल- गिरीश महाजन 

राज्यात आज सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, एस. टी. कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य जनता नाराज आहे. राज्यात सरकार कसे चालले आहे.

आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, ते स्वःताहून पडेल- गिरीश महाजन 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : भाजप सरकार पाडणार असल्याची आवई अधूनमधून तेच उठवित असतात. आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही. तिघांचे पायात पाय अडकून तेच पडणार आहेत, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देताना केली.

वाचा आवश्य- तिचा निर्णय धाडसी..वडिलांच्‍या निधनानंतर केले मुंडण 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना राज्यात सरकार पाडण्याचा कोणताही फॉर्म्युला चालणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देताना माजी मंत्री महाजन म्हणाले, की राज्यातील सरकार पाडणार असे आम्ही कधीही म्हणालो नाही. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी सोबत विधानसभा निवडणूक लढविली. जनतेसाठी आम्ही विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवित आहोत. राज्यात आज सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, एस. टी. कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य जनता नाराज आहे. राज्यात सरकार कसे चालले आहे, हे सर्वांना दिसून आले आहे. त्यामुळे आम्हाला सरकार पाडण्यासाठी कोणताही फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही. आम्ही तसा विचारही करीत नाही. 

आमचा घात करून ते सत्तेत बसले

शिवसेनेने आमचा घात करून ते सत्तेत जाऊन बसले आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षाचे काम करीत आहोत. परंतु सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या अवस्थेत असून,

काळ, वेळ निश्‍चित येईल 
राज्यातील सरकारमधील नेते व मंत्री अस्वस्थ आहेत, असे मत व्यक्त करून महाजन म्हणाले, की त्यामुळेच भाजपवर टीका करीत असतात. परंतु ते आमच्याबाबत काहीही म्हणत असले, तरी त्यांनी बोलण्याची घाई करू नये. ते काहीही म्हणत असले तरी या सरकारचा काळ आणि वेळ निश्‍चित येईल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top