चांगली बातमी : साकेगावच्या वाघूर नदीवरील नवीन पूल वाहतुकीस खुला 

sakegaon railway bridge
sakegaon railway bridge

जळगाव : साकेगाव (ता.भुसावळ) जवळील वाघूर नदीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेला नवीन पूल आजपासून वाहतुकीस सुरू केला आहे. यामुळे जुन्या वाहतूक पुलावरील वाहतुकीची कोंडी दूर होऊन जळगाव ते भुसावळ मधील अंतर कमी वेळेत गाठणे शक्‍य होणार आहे. वाघूर नदीवर ब्रिटिश कालीन पुल होता. तो जुना झाल्याने धोकादायक बनला होता. हा पुला लॉकडाऊनच्या काळात कंत्राटदाराने बांधून पूर्ण केला आहे. ऑक्‍टोबर 2021 पर्यंत तरसोद ते चिखली दरम्यानचे काम पूर्ण करण्यावर भर असेल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. 

चिखली (ता. मुक्ताईनगर) ते तरसोद (ता.जळगाव) दरम्यान 62. 7. किलोमीटर लांब, तर भुसावळ तालुक्‍यातील 34 किलोमीटरचे महामार्ग चौपदरीकरणाचे काम तब्बल 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे चौपदरीकरणाच्या कामास ब्रेक बसला अनेक. कामावर बहुतांश परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी निघून गेल्याने कामाचा वेग कमी झाला आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर महामार्गावर हाती घेतलेल्या महत्त्वाच्या ठिकाणचे रस्ते पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. 

लॉकडाउनमध्ये पुलाचे काम.. 
एप्रिल महिन्यात मुंबईवरून परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतल्याने वेलस्पन कंपनीचे मजूरही काम सोडून जाऊ लागले. अशातही काही मजुरांना येथेच थांबण्यास सांगून, स्थानिक मजुरांच्या सहाय्याने वाघूर नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पुलाला धोका निर्माण झाला होता. यामुळे लॉकडाउनच्या काळात या पुलाला समांतर तयार करण्यात येत असलेल्या पुलाच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर मिळवून काम वेगात पूर्ण करण्यात आले. आज हा पुला वाहतुकीस खुला करण्यात आल्याने महामार्गाने ये-जा करणाऱ्यांना सोईचे झाले आहे. 

महामार्ग चौपदरीकरणात सध्या तरसोद ते नशिराबाद दरम्यान 65 टक्के, डॉ.उल्हास पाटील कॉलेज ते साकेगाव 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान 65 टक्के काम पूर्ण आहे. अपूर्ण काम जसजसे मजूर उपलब्ध होत आहेत. तसतसे ते पूर्ण करण्याकडे भर दिला जात आहे. महामार्ग चौपदरीकरणात भुसावळ तालुक्‍यातील नदीनाल्यांवर पाच छोटे पूल तयार होतील. यात प्रामुख्याने वरणगाव बायपासवरील नाल्यावर 12 मीटर लांब, कपीलवस्ती परिसरात 44 मीटर, शहरातील आलिशान वॉटर पार्क परिसरात 26.4 मीटर, शहरातील वांजोळा रोड परिसरात 22.5 मीटर लांब लहान पुलांची निर्मिती केली जाणार आहे. 

भुसावळला अंडरपासचे काम सुरू 
शहरातील नाहाटा महामार्ग चौफुलीवर महामार्ग प्राधिकरणाने व्हीयुपी अर्थात व्हेईकल अंडरपास तयार करण्यात येत आहे. 3.5 मीटर उंच व 29 मीटर रुंद या अंडरपासमुळे महामार्गावरील वाहतूक विनाखोळंबा पुढे जाऊ शकेल. महामार्गावरील वरणगाव बायपासवरील आयुध निर्माणी प्रवेशद्वार परिसरात 5.5 मीटर उंच व 28 मीटर रुंद अंडरपास व्हेईकल राहणार आहे. हे कामही आता सुरू होणार आहे. यासह वरणगाव नाका, खडकारोड चौफुली, महेश नगर परिसर, भुसावळातील नवोदय विद्यालय परिसरातील बायपास जवळ अंडरपास व्हेईकल ब्रीजचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com