
शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आत्तापर्यंत ८५६ पैकी ७५० शाळांची तपासणी झाली आहे.
जळगाव : कोरोना संसर्गाचा सामना करीत जिल्हा प्रशासनाने आज पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने शाळा निर्जंतुकीकरणाची कामे पूर्ण झाले आहे. असे असले तरी पालकांनी संमती दिली तरच पाल्यांना शाळेत जाता येणार आहे. ७२ हजार पालकांचे संमतिपत्रक शाळांना पात्र झाले आहे. विद्यार्थ्यांना मास्क घालूनच शाळेत यावे लागणार आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे.
आवश्य वाचा- थरारक..दुचाकीवर मागून येत पिस्तुल काढली आणि पाच मिनिटात खेळ खल्लास
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या दोन लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ ७२ हजार पालकांनी संमतिपत्र दिले असून, तब्बल दीड लाख पालकांनी नकार दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८५६ शाळांपैकी १८८ शाळांनी शाळा सुरू करण्यास सहमती दर्शविलेली नाही.
जिल्ह्यात मंगळवारपासून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधित शाळांना तयारी करण्यास सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी तयारीची पाहणी गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाचे अधिकारी विविध ठिकाणी भेटी देऊन करत आहेत. आत्तापर्यंत ८५६ पैकी ७५० शाळांची तपासणी झाली आहे.
दृष्टिक्षेपात शाळांची स्थिती
एकूण शाळा : ८५६
विद्यार्थी : दोन लाख १७ हजार ९१
शिक्षक : नऊ हजार ६६७
शिक्षकेतर कर्मचारी : तीन हजार २६१
कोरोना चाचणी झालेले शिक्षक : आठ हजार ८८६
पॉझिटिव्ह शिक्षक : १४
संमतिपत्र दिलेले पालक : ७२ हजार
निर्जंतुकीकरण झालेल्या शाळा : ६४५
शाळा सुरू करण्यास होकार दिलेल्या शाळा : ६६८
संपादन- भूषण श्रीखंडे