शिवभोजन केंद्राच्या ७५ थाळ्या कमी होणार; काय आहे कारण वाचा 

देवीदास वाणी | Tuesday, 15 December 2020

मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मनोहर रेस्टॉरंटची या शिवभोजन केंद्राची तपासणी केली असता अनियमितता आढळून आली होती़.

जळगाव : शहरातील एका शिवभोजन केंद्रावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना अनियमितता आढळून आल्याने तपासणी होत नसल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, ज्या केंद्रावर अनियमितता आढळून आली तेथील ७५ थाळ्या कमी करण्यात आल्या आहेत. 

नक्‍की वाचा- घरात लग्नाची तयारी सुरू आणि वधू घरातील पैसे घेवून पसार

जिल्हाधिकारी राऊत यांच्या उपस्थितीत शिवभोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १४) झाली. या बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते़. मार्च-एप्रिल महिन्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मनोहर रेस्टॉरंटची या शिवभोजन केंद्राची तपासणी केली असता अनियमितता आढळून आली होती़. त्यामुळे या केंद्रावरील १५० थाळ्यांपैकी ७५ थाळ्या कमी करण्यात आल्या होत्या़. कमी केलेल्या ७५ थाळ्या या इतर केंद्रांना वाढवून देण्यासाठी सोमवारी बैठकीत चर्चा करण्यात आली़. चर्चेअंती शहरातील तीन केंद्रांना प्रत्येकी २५ असे एकूण ७५ थाळ्या वाढवून देण्याचे ठरले़. त्यानुसार शहरातील १६ केंद्रांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे़त. 

Advertising
Advertising

तीन केंद्रांना थाळ्या वाढवून देणार 
शासनाकडून १६ शिवभोजन केंद्रांमधील तीन केंद्रांची निवड करण्यात येईल़. त्याच केंद्रांना प्रत्येकी २५ थाळ्या वाढवून दिल्या जाणार आहेत. शहरातील तीन शिवभोजन केंद्रांना प्रत्येकी २५ थाळ्या वाढवून देण्यात येणार आहे़. यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून, त्या प्रस्तावांमधील तीन केंद्रांची निवड ही शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे़. 

संपादन ः राजेश सोनवणे