साड्यांच्या दुकानात तिघे गेले आणि जावुन काय केले ? वाचा 

भूषण श्रीखंडे
Saturday, 19 December 2020

अनोळखी व्यक्तींनी दुकानात येवून साडी घेण्याचा बहाणेने दुकाना घुसले. कोणतेही कारन नसतांना दुकानदार यांच्याशी वाद घातला.

जळगाव ः  शहरातील बळीराम पेठ परिसरातील महात्मा गांधी मार्केट समोरील एका कापड दुकानात तीन पुरुषांनी जावून असे काही केले की थेट पोलिस ठाण्यात दुकानदाराला जावे लागले. आणि या तिघांविरुध्द दुकानदाराला तक्रार दाखल करावी लागली. या घटनेत पोलिसांनी तक्रार नोंदवित एक संशयीताला अटक केली.

महत्वाची बातमी-  ‘कोरोना’ लसीचे दोन डोस; जळगावात जानेवारीत येणार लस

जळगाव शहरात हल्ली व्यापारी संकुलन तसेच रहिवाशी परिसरात चोऱयांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात मारामाऱ्य़ांचे प्रमाण देखील वाढल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात थेट सकाळी भर मार्केट परिसरात साडी दुकानात तिन जण आत शिरून दुकानचालकाला शिवीगाळ करून, मारण्याची धमकी देवून साड्या चोरल्याची घटना घडली आहे.

आवर्जून वाचा- व्हीआयपी, चॉईसचा मोबाईल नंबर हवाय ! तर मग वाचा.. 

अशी आहे घटना 
जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले महात्मा गांधी व्यापारी संकुलनाच्या समोर अशोक कुमार सनमुखदास राजपाल यांचे गुलशन साडी दुकान आहे. गुरूवारी सकाळी साडदेहाला सुरेश पुंडलीक ठाकरे (रा. जैनावाद) यांच्यासह अनोळखी व्यक्तींनी दुकानात येवून साडी घेण्याचा बहाणेने दुकाना घुसले. कोणतेही कारन नसतांना दुकानदार अशोक सनमुखदास राजपाल यांच्याशी वाद घातला. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत दुकानातून १ हजार ७०० रुपये किमतीच्या दोन साड्या त्यांनी चोरल्या. 

आवश्य वाचा- रात्री गप्पा मारल्या अन पहाटे घेतला गळफास

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
घडलेल्या घटनेबाबत अशोक सनमुखदास राजपाल यांनी शहर पोलिस ठाण्यात र्फियाद देवून सुरेश ठाकरे सह अनोळखी दोन व्यक्ति विरोधात तक्रार दिली. ठाकरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shopkeeper threatening robary saree shop