‘रेमडेसिव्हर’चा काळाबाजार थांबविण्यासाठी प्रशासन एक्शन मोडवर; सहा  मेडीकलवर छापे 

‘रेमडेसिव्हर’चा काळाबाजार थांबविण्यासाठी प्रशासन एक्शन मोडवर; सहा  मेडीकलवर छापे 

जळगाव ः शहरासह जिल्हयात कोरोनावर उपचारासाठी आवश्‍यक असलेले ‘रेमडेसिव्हर’ इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. या इंजेक्शनचा अवैधरित्या कोणी साठा केला आहे, काय याची अचानक तपासणी मेडीकलमध्ये जावून करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. त्यानूसार जिल्ह्यात आतापर्यंत सहा ठिकाणी मेडीकलवर छापे टाकून रेमडेसिव्हर’चा साठा केलेला आहे का? याची तपासणी करण्यात येत आहे. कालपर्यंतच्या छाप्यात ३३० रेमडेसिव्हर अवैधरित्या साठवणूक केलेले आढळले आहेत. शहरात आज ऑर्कीड हॉस्पीटल व पवन मेडीकलची तपासणी करण्यात आली. त्यात अवैधरित्यासाठा आढळून आलेला नाही. 

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी छापे सत्र अवलंबिली जात आहे. गेल्या दोन दिवसात ३३० बेहिशोबी रेमडेसिव्हर आढळून आले आहे. त्यात ३२० इंजेक्शन चाळीसगाव येथील स्टॉकीस्टकडे तर जळगावमध्ये १० इंजेक्शन बेहिशोबी आढळले आहेत. 

येथे आढळले अतिरिक्त इंगेक्शन

सुपर स्टॉकीस्ट पलोड एजन्सी, श्याम डिस्ट्रीब्यूटर्स व रुबी हॉस्पीटल भेट देवून कंपनीकडून प्राप्त इंजेक्शन व वितरीत इंजेक्शनचा हिशोब तपासला. पलोड एजन्सीकडे १० इंजेक्शन अतिरिक्त आढळले. 

३२० इंजेक्शन जादा आढळले

प्रशासनाला चाळीसगाव येथील एका स्टॉकीस्टकडे अतिरिक्त इंजेक्शन असल्याची माहिती मिळाल्यावर तपासणी करण्यात आली. यावेळी ३२० इंजेक्शन जादा आढळले. त्याची नोंद जिल्हा प्रशासनाने रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या समितीच्या दप्तरी नोंदविली. जिल्ह्यावरुन चाळीसगाव तालुक्याला वितरीत होणारा ३०० इंजेक्शनचा साठा कमी पाठवला. 

यांनी मारले छापे

जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, महापालिकेचे उपायुक्त संतोश वाहुळे, अन्न व औषध प्रशासनाचे निरीकि आबासाहेब रासकर चार जणांचे पथक नियूक्ती केले आहे. आज दोन ठिकाणी शहरात टाकलेल्या छापे पुरवठा विभागाचे के.आर. तडवी, पी.पी.पाटील, निवासी नायब तहसिलदार दिलीप बारी यांचा सामावेश आहे. 


 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com