आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

भूषण श्रीखंडे | Wednesday, 9 December 2020

मृतदेह रात्री पळासदळ शिवारात संशस्पाद रित्या आढळून आला. त्यामुळे कुंझर यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एरंडोल ः राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा पळासदळ शिवारात मृतदेह संशयास्पद आढळून आला आहे. ते एरंडोल तालुक्यातील गालापुर येथिल जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होते. संशास्पद मृतदेह असल्याने घातपात झाल्याची शंक्यता वर्तवली जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त किशोर पाटील-कुंझरकर हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पत्नी देखील शिक्षक असून कोरोना काळात कुंझरकर यांना विद्यार्थ्यांना घरोघरी जावून शिक्षणाचे धडे दिले होत.

कुंझरकर सायंकाळ पासून होते बेपत्ता

Advertising
Advertising

मंगळवारी सायंकाळ पासून कुंझरकर घरी आलेले नव्हते. मात्र त्यांचा मृतदेह रात्री पळासदळ शिवारात संशस्पाद रित्या आढळून आला. त्यामुळे कुंझर यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदर्श शिक्षकाचा संशास्पद संशास्पद मृत्यूमूळे मात्र खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे.