esakal | शिक्षकाचा मृत्‍यूनंतर परिवारासाठी सरसावताय शिक्षकांचे हात
sakal

बोलून बातमी शोधा

family support

चोपडा तालुक्‍यातील शिक्षक संघटनांच्यावतीने उपक्रम राबविला जात आहे. तालुक्‍यातील एखाद्या शिक्षकाचे निधन झाल्‍यास त्‍यांच्या परिवारास मदतीचा हात म्‍हणून उपक्रम राबविण्यास सुरवात केली.

शिक्षकाचा मृत्‍यूनंतर परिवारासाठी सरसावताय शिक्षकांचे हात

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा (जळगाव) : प्राथमिक शिक्षकांमध्ये एकमेकांबद्दल असलेली माणुसकी व प्रेम याचा प्रत्यय वारंवार येतो. शिक्षक बंधू भगिनींमध्ये दुर्दैवाने कुणाचाही मृत्यू झाल्यास तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना व शिक्षक, शिक्षिका मयत शिक्षक परिवारास मदतीचा हात देऊन माणुसकी जपत आहेत. कोणावरही अशी वेळ येऊ शकते या भावनेतून स्वतः पदरमोड करून सदर परिवाराच्या मागे आर्थिक पाठबळही उभे करुन आपले योगदान देत असल्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.

चोपडा तालुक्‍यातील शिक्षक संघटनांच्यावतीने उपक्रम राबविला जात आहे. तालुक्‍यातील एखाद्या शिक्षकाचे निधन झाल्‍यास त्‍यांच्या परिवारास मदतीचा हात म्‍हणून उपक्रम राबविण्यास सुरवात केली. यात आतापर्यंत चार शिक्षकांना ३ लाख ५२ हजार रुपयांचा मदतीचा हात त्यांच्या कुटुंबियांना दिला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातुन कौतुक होत आहे. 

अडावद येथील देशमुख परिवारास मदत
अडावद जि. प. शाळेतील उपशिक्षक संजय काशिनाथ देशमुख यांचे दुर्दैवी निधन झाले. या उपक्रमातील एक भाग म्हणून चोपडा तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांना मदतनिधीसाठी केलेल्या विनंतीनुसार ७५ हजार रुपये तसेच डिसीपीएससह इतर शिक्षकांनी वैयक्तिक ५२ हजार असे एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपये रोख स्वरुपात एकत्रीत रक्कम देशमुख यांच्या परिवारास दिली. देशमुख परिवाराच्या घरी जावून जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस योगेश सनेर, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस सतिष बोरसे, पारोळा पतसंस्थेचे माजी चेअरमन पंकज बडगुजर, युवराज पाटील, धनराज बडगे, चंद्रकला इंगळे, अमृत पाटील, दिपक वराडे, प्रशांत सोनवणे, कैलास ठाकुर, प्रशांत पाटील, रविंद्र देशमुख, रवींद्र पवार, गजानन पाटील, अशोक महाजन आदी शिक्षक उपस्थीत होते

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top