esakal | रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नाही, एसटीला तोबा गर्दी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नाही, एसटीला तोबा गर्दी ! 

नागरिकांना वेटिंग लिस्टचे तिकीट दिले जात आहे. मात्र ते कन्फर्म झाल्याशिवाय गाडीत प्रवेश दिला जात नसल्याची दुसरी बाजू आहे. किमान वेटिंग लिस्टवर गाडीत प्रवेश दिला जावा.

रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश नाही, एसटीला तोबा गर्दी ! 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : दिवाळीच्या मंगल पर्वातील भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, शहरी भागातील महिलांनी माहेरी जाण्यासाठी एसटी बस, रेल्वेला रविवारी, सोमवारी गर्दी केली होती.

यंदा रेल्वेने आरक्षणाशिवाय प्रवास नाकारला असल्याने अनेकांनी रेल्वे आरक्षणावर भर दिला. काहींनी एसटीने जाणे पसंत केले. रेल्वेला आरक्षणाशिवाय प्रवेशाची होणारी गैरसोय पाहता एसटी अनेक मोठ्या शहरांमध्ये, जिल्हांतर्गत जादा बस सोडून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली. रविवार (ता.१५), सोमवार (ता. १६), मंगळवार (ता.१७) असे तिन्ही दिवस जादा बस सोडण्यात येणार आहेत. 

रेल्वेचे आरक्षण फुल 
दिवाळीनिमित्त आपापल्या गावी जाण्यासाठी नागरिकांनी अगोदरच रेल्वेचे आरक्षण केले होते. यामुळे २० नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल आहे. नागरिकांना वेटिंग लिस्टचे तिकीट दिले जात आहे. मात्र ते कन्फर्म झाल्याशिवाय गाडीत प्रवेश दिला जात नसल्याची दुसरी बाजू आहे. किमान वेटिंग लिस्टवर गाडीत प्रवेश दिला जावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. 

महामार्गावर वाहतुक कोंडी

महामार्ग क्रमांक सहावर आज गावी जाणाऱयांची तोबा गर्दी पाहण्यास मिळत होती. दुचाकी-चारचाकी वाहनांद्वारे गावांना जाणाऱयाचे प्रमाण वाढल्याने महामार्गावर वाहतुक कोंडी अनेक ठिकाणी झालेले होतो.  

संपादन- भूषण श्रीखंडे