ठेके बंद, वाहतुकीलाही बंदी; मग विनानंबर ट्रॅक्‍टरद्वारे बेकायदेशीर वाहतुक

valu vahtuk
valu vahtuk

जळगाव : वाळू वाहतुक दारांना कायद्याचा धाकच नसल्याने ठेके बंद असतांनाही दिवसरात्र वाळूचा उपसा सुरु आहे, सुसाट वेगात पळणाऱ्या या वाहनांचा अपघात झाल्यास सहज पळता यावे म्हणुन विनानंबर प्लेटची वाहने वापरली जातात. मेहरूण परिसरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर एमआयडीसी पोलीसांनी पहाटे अडवुन ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्ह्यातील वाळू ठेके बंद आहेत, त्याच प्रमाणे जिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी अवैध वाळू वाहतुकीच्या विषयी सक्त निर्देष पेालिस ठाण्यांना दिले आहेत. असे असतांना मोहाडी येथील गिरणा नदीच्या पत्रातून बेकायदेशीर ट्रॅक्टरने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार श्री.शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी,जितेंद्र राजपूत , होमगार्ड किरण जोशी, शिवदास कळसकर अशांना ट्रॅक्टरवर कारवाईसाठी रवाना केले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरातील मेहरूण परिसरातील बागेजवळ वाळूने भरलेले ट्रक्टर आढळून आले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतूक करण्याची परवाना मागितले असता उडवाउडवीची उत्तरे चालक संदीप मधुकर कोळी (वय-२०) रा. नागझिरी ता.जि.जळगाव याने दिली. वाळू वाहतूकीचा पंचनामा करून ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला आहे. असून जितेंद्र राजपूत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. 

जिवावर उठले वाळूवाले 
जिल्हा प्रशासनाने बेकादा वाळू वाहतुकदारांची वाहने जप्त करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत. दुसरीकडे दिवसरांत्र वाळूची वाहने सुसाट वेगात सुरु आहे. कॉलन्या व मुख्य रस्त्यांवर अपघाताला कारभुत हि वाहने आता चक्क विनानंबरप्लेटची धावत आहे. कारवाई करणारे पेालिस, पथक व अपघात झाल्यावर सहज पळता यावे म्हणुन या वाहनांची नंबरेप्लेट मुद्दमाम लावण्यात येत, उपप्रादेशीक परिवहन विभागाने अशा वाहनांवर कोठर कारवाईची मागणी आता धेार धरु लागली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com