esakal | धक्‍कादायक घडले; पण बसमधून उतरताच पोलिसांनी घेतले ताब्‍यात
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

भाजीपाला व्यवसाय सुरू केलेल्‍या मित्रासोबत पत्‍नीला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्‍ती त्‍याने केली. असे न केल्‍यास मुलांना जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या दिल्‍या. सदर महिलेला पतीने एके दिवशी कोल्‍ड्रींग पाजले.

धक्‍कादायक घडले; पण बसमधून उतरताच पोलिसांनी घेतले ताब्‍यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील महिलेवर अत्‍याचार करण्यासाठी मित्राला मदत करणाऱ्या पतीला पोलिसांनी सापळा रचत ताब्‍यात घेतले. महामंडळाच्या बसमधून पुण्याहून जळगावी आल्‍यानंतर बसमधून उतरताच पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. मात्र त्‍याचा मित्र फरार आहे.

अवश्‍य पहा- थरारक..बिबट्या शिरला चाळीत; साऱ्यांचाच थरकाप, वासरीला घेवून क्षणात पसार 

शहरातील वाल्‍मिकनगरात राहणाऱ्या व धुळे येथील माहेर असलेल्‍या एका महिलेवर अत्‍याचार झाल्‍याची घटना उघडकीस आली. या घटनेत तिच्या पतीनेच हा प्रकार करण्यास तिला भाग पाडले होते. भाजीपाला व्यवसाय सुरू केलेल्‍या मित्रासोबत पत्‍नीला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्‍ती त्‍याने केली. असे न केल्‍यास मुलांना जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या दिल्‍या. सदर महिलेला पतीने एके दिवशी कोल्‍ड्रींग पाजले. यानंतर बाथरूममध्ये नेवून तिला पकडून ठेवत मित्राला अत्‍याचार करण्यास लावल्‍याची तक्रार महिलेने दिली आहे.

गुप्त माहिती मिळताच बसला अटकाव
पती- पत्‍नीच्या नात्‍याला काळीमा फासणाऱ्या घटनेप्रकरणी १८ सप्टेंबरला महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली. पोलिसांनी प्रथम वाल्‍मिकनगरातील घराची चौकशी केली असता महिलेचा पती शिरपूर व पुणे येथे असल्‍याचे सांगण्यात आले. पोलिसांनी अधिक तपास केला असता तो पुण्यात असल्‍याचे समजले. याच दरम्‍यान संबंधीत इसम हा जळगावी येत असल्‍याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पुण्याहून येणारी बस शहरातील स्‍वातंत्र चौकात थांबवून पोलिसांनी त्‍यास ताब्‍यात घेतले. ही कारवाई आज दुपारी बारा ते एकच्या सुमारास करण्यात आली असून एपीआय संदीप परदेशी, भुषण पाटील, तुषार विसपुते, रूपेश ठाकूर यांनी सापळा रचत कारवाई केली.

loading image