
शहरातील कांचननगर परिसरातील रहिवासी प्रमोद शेटे या तरुणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिच्या मृत्युनंतर प्रमोदने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्त्या केल्याने एकच खळबळ उडाली.
जळगाव : माझी मुलगी कांचन याचे गल्लीतच प्रमोद शेटे यांच्याशी प्रेम विवाह केला होता. मात्र, पतीकडून तिचा सतत छळ सुरु होता. मारहाण करीत असल्याची तक्रारही तिने पेालिसात केली हेाती. आपल्या मुलीची हत्त्या करुन नंतर प्रमोदने आत्महत्या केल्याचा आरोप कांचनचे वडील राजेंद्र वाणी यांनी केला आहे.
शहरातील कांचननगर परिसरातील रहिवासी प्रमोद शेटे या तरुणाची पत्नी कांचन शेटे (वाणी) हिच्या मृत्युनंतर प्रमोदने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्त्या केल्याने एकच खळबळ उडाली. पत्नी या जगात नसल्याने आपल्यालाही जगण्यात रस (इंट्रेस्ट) नाही, असे म्हणत त्याने तोंड न दाखवताच रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. मात्र, कांचने शेटे- वाणी हिचे वडील राजेंद्र वाणी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, की आपली मुलगी कांचन हिला पतीकडून मारझोड होत असल्याची तक्रारी शनिपेठ पेालिसात दाखल आहे. समझोता झाल्यावर ती नांदायला गेली होती.
पती-पत्नीत वाद
कांचन- प्रमोद यांना तीन व दिड वर्षे वयाच्या दोन मुली असुन दोघा मुलींची तब्येत खराब असल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी काल संध्याकाळी कांचनने प्रमोदकडे पैशांची मागणी केली. मात्र, प्रमोदने पैसे दिले नाही. तुम्हाला दारु प्यायला पैसे आहेत. मात्र मुलींच्या दवाखान्यासाठी नाही; असे कांचनने सांगितल्यावर पती- पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रात्रीतून कांचनचा विष घेतल्याने मृत्यू झाला. त्यानंतर प्रमोदने आत्महत्त्या केली. आपल्या मुलीला मारुनच जावायाने आत्महत्त्या केल्याचा आरोप राजेंद्र वाणी यांनी केला.