जि. प. तील कोरोना योद्धा अधिकारीच पॉझिटीव्ह! 

corona
corona

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोनाला पछाडण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात असणाऱ्यांना कोरोना व्हायरसने जखडले आहे. यात जिल्हा परिषदेतंर्गत काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील प्रमुख लिडर आणि कोरोना योद्धा असलेले अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपुर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना विरूद्ध लढा युद्ध पातळीवर सुरू आहे. डॉक्‍टर, नर्स या आरोग्य यंत्रणेसह पोलिस प्रशासन देखील तितकेच लढ्यात उतरले आहेत. ही लढाई लढत असताना यात अनेकांना बाधा झाली आहे. यामध्ये दीड महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी देखील कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर घरी परतले आणि कोरोनाच्या लढाईत पुन्हा उतरले आहेत. तर आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत ग्रामीण भागात काम सुरू आहे. यावर नियंत्रण असलेल्या प्रमुख अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. 
 
आरोग्य विभागच क्‍वारंटाईन 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे कामकाज सुरू आहे. गावांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी याच ठिकाणाहून यंत्रणा काम सांभाळत आहे. असे असले तरी त्याची सर्व सुत्र आरोग्य विभागातून हलत असतात. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम सांभाळत गेल्या चार महिन्यांपासून कोरोना योद्धा म्हणून लढत असलेले प्रमुख अधिकारी आज कोरोना बाधित झाले आहेत. प्रमुख अधिकारी पॉझिटीव्ह आल्याने जिल्हा परिषदेचा संपुर्ण आरोग्य विभागच क्‍वारंटाईन होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com