जिल्‍हा परिषदेचा अनागोंदी; ‘नियोजन’च्या निधीचा खर्चच सादर केला नाही

जिल्हा नियोजन विभागाकडून दरवर्षी विविध कामांसाठी निधी मिळतो.
jalgaon zp
jalgaon zpjalgaon zp

जळगाव : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन विभागाकडून दरवर्षी विविध कामांसाठी निधी मिळतो. मार्चअखेर मिळालेला निधी खर्च करायचा असतो. मात्र यंदा जिल्हा परिषेदेने मार्च अखेर झाल्यानंतरही नियोजन विभागाला आर्थिक वर्षात झालेला खर्च, अखर्चीत निधी सादर केला नाही. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना पत्र पाठवून खर्च सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.

२९ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०१९- २० अंतर्गत या कार्यालयाने जिल्हा परिषदेकडील योजनांसाठी वितरीत केलेल्या निधीमधुन अखर्चित असलेल्या निधीची माहीती जिल्हा प्रशासनाला मिळाली. प्राप्त झालेल्या माहिती वरुन असे दिसून आले होते की, २०१९-२० मध्ये वितरीत केलेल्या ११६ कोटी २४ लाखातून डिसेंबर २०२० अखेरपर्यंत फक्त ५२ कोटी ८२ लाख खर्च झाला होता. तर ६३ कोटी ४२ लाख निधी शिल्लक होता.

जिल्‍हाधिकारींचे पत्र

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीत ‘संपूर्ण निधी खर्च होईल’ असे सांगण्यात आले होते. आर्थिक वर्ष संपले आहे. आता शिल्लक असलेल्या ६३ कोटी ४२ लाखांतून ३१ मार्च अखेर प्रत्यक्ष किती निधी खर्च झाला व किती निधी अखचित राहीला. या| बाबत योजनानिहाय माहिती या कार्यालयास सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com