esakal | अजबच..स्‍वतःवर कारवाई करण्याचे पत्र काढले
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon zilha parishad

जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत; त्यांची बिले देतांना गौण खनिजाची रक्कम बिलात समाविष्ट केली होती, ती रक्कम शासनास जमा न करता रॉयल्टी भरल्याचे बनावट कागदपत्र जोडण्यात आले आहे.

अजबच..स्‍वतःवर कारवाई करण्याचे पत्र काढले

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील गौण खनिज प्रकरणात झालेल्या गैरकारभाराच्या चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र सदर प्रकरणात सिंचन विभागातील अधिकाऱ्याने स्वतःवरच कारवाई करण्याची नोटिस दिल्‍याचा प्रकार उघड झाला आहे.

जलसंधारण विभागाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत; त्यांची बिले देतांना गौण खनिजाची रक्कम बिलात समाविष्ट केली होती, ती रक्कम शासनास जमा न करता रॉयल्टी भरल्याचे बनावट कागदपत्र जोडण्यात आले आहे. या प्रकारातून सदरची रक्कम मक्तेदारास देण्यात आली आहे. याबाबत बनावट कागदपत्रे जोडल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान मान्य केले आहे. त्याबाबत माहिती मागविल्याचे सदस्‍या पल्लवी सावकारे यांनी निवेदनात म्हटले आहे.

खरी माहिती लपविण्याचा प्रकार
जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी आजवर अपूर्ण तसेच दिशाभूल करणारी माहिती दिली असल्‍याचे सावकारे यांनी सांगितले आहे. विशेष म्‍हणजे श्रीमती सावकारे या जिल्हा परिषद सदस्या तथा जलव्यवस्थापन समितीवर असताना देखील त्‍यांना खरी माहिती देण्यात येत नसल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. 

अन्‌ पाटलांनी काढले स्‍वतःवरील कारवाईचे पत्र
जलसंधारण विभागातील अधिकारी एस. एल. पाटील यांनी भडगाव उपविभागाचे अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, त्याचा पदभार पाटील यांच्याकडेच आहे. त्यामुळे ते हेतुपुरस्कार दुर्लक्ष करीत असल्‍याचा आरोप करून पल्लवी सावकारे यांनी दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


 

loading image
go to top