विरोधकांचा बहिष्‍कार..सत्‍ताधारी भाजपची गोची; कोरम नसतानाही सभा चालविली

अर्थसंकल्‍पाच्या विशेष सभेत दुरूस्‍ती सुचविण्यात आली होती.
jalgaon zp
jalgaon zpjalgaon zp

जळगाव : कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असताना जिल्‍हा परिषदेकडून आरोग्‍याकरीता केवळ ४१ लाखाची तरतूद करण्यात आली. विशेष म्‍हणजे इमारत दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली. अर्थसंकल्‍पाच्या विशेष सभेत दुरूस्‍ती सुचविण्यात आली होती. मात्र मागील कोणतीही माहिती न दिल्यामुळे विरोधी गटातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद अर्थसंकल्प सभेवर बहिष्कार टाकला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता असून, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात आहेत. गेल्‍या महिन्यात झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय सभेत काही दुरूस्‍ती सुचवत अर्थसंकल्‍पास मंजुरी देण्यात आली होती. मात्र याबाबत आजच्या सभेत कोणत्‍याही प्रकारे व्यवस्‍थित उत्‍तर सत्‍ताधारी गटाकडून देण्यात आले नसल्‍याने विरोधी पक्षातील सदस्‍यांनी सभेवर बहिष्कार टाकत बाहेर पडले.

भाजपच्या सदस्‍यांचाही बहिष्‍कार

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते रवींद्र नाना पाटील यांनी सांगितले की, अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधारी भाजपने मागील खर्चाची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थितीत असताना त्यावर उपचारासाठी केवळ ४१ लाख रुपये खर्चाची तरतूद ठेवली. तर इमारत दुरुस्तीसाठी तब्बल आठ कोटी रुपयांच्या तरतूद केली. त्यामुळे विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या ही पाच जणांनी बहिष्कार टाकला. सभेत पुरेसा कोरम नसतानाही सभा घेऊन सत्ताधारी भाजपने सर्व विषय मंजूर केले. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर ठरविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com