esakal | एक लाखाचे आणले पाच लाख; कपाशी घेवून हाती दिल्‍या बनावट नोटा
sakal

बोलून बातमी शोधा

counterfeit notes

फक्त एका लाखात पाच लाखांची बनावट नोटा आणल्या होत्या. आणी या सर्व नोटा 500 च्या किंमतीच्या आहेत, त्यातील बहुतांश नोटा कपाशी खरेदीत खपवीण्यात आल्या,

एक लाखाचे आणले पाच लाख; कपाशी घेवून हाती दिल्‍या बनावट नोटा

sakal_logo
By
सुरेश महाजन

जामनेर (जळगाव) : बनावट (नकली) चलनी नोटांद्वारा चक्क कपाशीचा व्यापार करणाऱ्या एकास खबऱ्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन 26 हजार 500 च्या बनावट नोटांसह ताब्यात घेतले. 
शेख फारूक शेख नवाब (वय 45, रा. शहापुर, ता. जामनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. आरोपी फारूक शेख हा लहान- मोठ्या मालवाहतुक वाहनांमधून कपाशी खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. इतरांपेक्षा शेतकऱ्यांना क्विटलमागे शंभर- पन्नास रुपये जादा भाव सांगतो; त्यामुळेही अनेकांचा ओढा त्याकडे जास्त असतो. मात्र या कपाशीच्या खरेदी करतांना कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती मात्र बऱ्याचशा बनावट नोटांचा भरणा इतर अस्सल करंसित मोजल्या जातात. याकडे शेतकऱ्यांसह कोणाचेच लक्ष नसल्याने आरोपीने बाजारात कोठुन आणल्या किती व कोठे- कोठे बनावट नोटा वापरल्या याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पाच लाखांच्या बनावट नोटा
आरोपीच्या सांगण्यानुसार फक्त एका लाखात पाच लाखांची बनावट नोटा आणल्या होत्या. आणी या सर्व नोटा 500 च्या किंमतीच्या आहेत, त्यातील बहुतांश नोटा कपाशी खरेदीत खपवीण्यात आल्या,तर पोलीसांनी अटक केली त्यावेळी आरोपीताजवळ 26,500 च्या बनावट चलनी नोटा आढळुन आल्या,या घटनेमुळे विवीध व्यापारी वर्गासह ग्राहकांमधे घबराटीचे वातावरण आहे.

मोठे रॅकेटच यामागे असण्याची शक्यता
गुजरातसह राज्यातील नंदुरबार, बोदवड, जामनेरमध्ये या नकली नोटांच्या वापराची शक्यता असल्याने त्या दिशेनेही तपासाची चक्रे फिरविण्यात आल्याचे समजते. त्यामुळे बनावट नोटा बाळगुन त्यांना व्यापारीकरणाच्या नावाखाली खपविण्याच्या गोरख धंद्यामागे परीसरातील एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंटरच्या सहाय्याने लागला सुगावा
स्थानीक गुन्हे शाखेचे विजय पाटील व सचिन महाजन यांना त्यांच्या पंटरने दिलेल्या गुप्त माहितीवरून किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक प्रताप ईंगळे, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोकॉ सुनील दामोदर, विजय पाटील, नंदु पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन आदींच्या पथकाने सापळा रचुन आरोपीला बनावट नोटांसह ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान सुगाव्यानुसार आधी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणुन पाठविले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असुन आणखी किती जणांचा बनावट नोटा बाळगणे- खपविण्यात समावेश असेल याविषयी जनतेला उत्सुकता आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image